डोणगाव ही बाजारपेठ असून, येथे दररोज शेकडो लोक येतात. येथे वाशिम जिल्ह्यातील नागरिकही येतात. परंतु डोणगाव येथे कारवाई होत नसल्याने लोक मास्क वापरत नाही, तर स्थानिक बाजारात सर्रास गर्दी असते. एवढेच नव्हे तर रात्री चक्क थंडपेयाची दुकाने सर्रास सुरू असतात. याकडे स्थानिक प्रशासन व पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने सर्रास नियमांचे उल्लंघन होत आहे.
व्यापारीवर्गाने फिरविली तपासणीकडे पाठ
सर्वत्र कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न होत आहेत. असे असताना डोणगाव येथे मात्र व्यापाऱ्यांनी तपासणीकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. यामुळे संसर्ग वाढण्याची भीती नाकारता येत नाही. आपल्याला आणि इतरांना निर्माण होणारा धोका टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी स्वत:हून पुढाकार घेऊन तपासणी करणे गरजेचे आहे. यामुळे सर्वांना सुरक्षा प्रदान करण्यास मदत होईल.