महाराष्ट्र शासनाने काेविड १९ च्या अनुषंगाने राज्यात तिसऱ्या लाटेचा धाेका तज्ज्ञांनी वर्तवला आहे़ त्यामुळे, राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये श्रेणीनुसार निर्बंध लागू करण्याचे आदेश दिले आहेत़ त्यानुसार बुलडाणा जिल्ह्यात श्रेणी तीनचे आदेश जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी दिले होते यामध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकान वगळता सर्व दुकान सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली़ देऊळगाव राजा शहरात या नियमांचे पालन होत नसल्याने २२ जुलैच्या सायंकाळी नगरपरिषद मुख्याधिकारी यांचे पथक आणि सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद भारत नाते यांच्या संयुक्त पथकाने दुकानदारांवर कारवाई करून १६ हजार रुपयांचा दंड वसूल केला़ नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने केलेल्या संयुक्त कारवायामुळे वेळेनंतर सुरू ठेवणाऱ्या दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे़
काेराेनाविषयक नियमांचे उल्लंघन, १६ हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 4:21 AM