- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : कोरोना काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांना वठणीवर आणण्यासाठी खामगावात सर्वाधिक कारवाई करण्यात आल्या. यामध्ये लॉकडाऊनमध्ये २६७, तर कडक निर्बंध कालावधीत २८० कारवाई करण्यात आल्याचे समोर येत आहे. खामगाव पोलीस स्टेशन हद्दीत जिल्ह्यातील सर्वाधिक ४५५ कारवाई करण्यात आल्यात. प्राप्त माहितीनुसार कलम १८८नुसार जिल्ह्यात १,५६६ कारवाई झाल्याचे समजते.आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिनियम २००५, भारतीय साथरोग अधिनियम १८९७, भारतीय दंड संहिता १८६०चे कलम १८८ व इतर संबंधित कायदे व नियम साथरोग नियंत्रणासाठी निर्धारित करण्यात आले आहेत. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे. त्यानुसार खामगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत नियमांचा भंग करणारे फळ विक्रेते, कापड व्यावसायिक, विनापरवानगी कार्यक्रम आणि विवाह समारंभ करणाऱ्यांवर आणि आस्थापना उघड्या ठेवणाऱ्या ४५५ जणांवर कारवाई झाली.
कोरोनाकाळात नियमांचे उल्लंघन; खामगावात सर्वाधिक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 12:02 PM