जीवशास्त्र विभागात मोलेक्युलर बियॉलॉजी व जेनेटिक इंजिनीअरिंग आणि इम्म्युनोलॉजी या विषयावर ई-कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते. या कॉन्फरन्ससाठी जिजामाता महाविद्यालय बुलडाणा येथील सहा. प्रा. ए. टी.मोरे तथा बी. एस. एस. एम. महाविद्यालय सोनगीरचे प्रा. गोपाल मालठाणे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अध्यक्षस्थानी विवेकानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. डी. पाटील हे होते. यावेळी विवेकानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. डी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. एस. एन. कस्तुरे, प्रा. एम. आर. कुडके, प्रा. एस. ए. अंबेकर यांनी केले. संचालन प्रा. एम. एम. सातपुते यांनी केले तर प्रास्ताविक प्राचार्य डॉ. के. डी. पाटील यांनी केले, तर आभार प्रा. एस. ए. आंबेकर यांनी मानले. कार्यक्रमास ४६ विद्यार्थी झूम ॲपद्वारे उपस्थित होते.