डोणगाव : डोणगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम आंधृड येथील‘सरपंच’ या व्हॉट्सअप ग्रुपवर अज्ञात व्यक्तीने अश्लील मॅसेज टाकूनबदनामी केल्याची घटना २ आॅगस्टला घडली. याप्रकरणी ४ आॅगस्ट रोजी गुन्हादाखल करण्यात आला.
आंधृड येथे ‘सरपंच’ या नावाने व्हॉट्सअप ग्रुप बनविण्यात आलेला आहे.त्यामध्ये आंधृड येथील एक महिला आहे. सदर ग्रुपवर महिलेचे छायाचित्रटाकून त्याखाली एक मोबाईल नंबरवरुन अश्लील मॅसेज टाकण्यात आला आहे.याबाबत आंधृड येथील महिलेने तक्रार केल्यानंतर ठाणेदार आकाश शिंदेयांच्या मार्गदर्शनात पिएसआय विलास मुंढे यांनी सदर नंबरचा शोध घेतला.सदर नंबर हरविल्याची नोंद मेहकर पोलिस स्टेशनला एक वर्षापूर्वीच करण्यातआलेली असून, गु्रपमध्ये ज्या नावाने नंबर आहे त्या व्यक्तीजवळही मोबाईलनसल्याने अज्ञात नंबर विरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६७ नुसारगुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पिएसआय विलास मुंढे करीत आहेत.(वार्ताहर)