शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

वडगाव गडवासीयांची पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2017 12:36 AM

वडगाव गड : जळगाव जामोद पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वडगाव गड गटग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराचा फटका वडगाव, हाशमपूर व इस्लामपूरसह परिसरातील वाड्या-वस्त्यांना बसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवडगाव गड : जळगाव जामोद पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वडगाव गड गटग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराचा फटका वडगाव, हाशमपूर व इस्लामपूरसह परिसरातील वाड्या-वस्त्यांना बसत आहे.सदर ग्रामपंचायतीच्या गावामध्ये आजपर्यंत कधी न बघितलेली पाणीटंचाई यावर्षी येथील जनता भोगत आहे. घरोघरी खासगी विहिरी खोदलेल्या आहेत; परंतु पाणी पातळी खोल गेल्यामुळे नागरिकांना खासगी विहिरी खोदणे अशक्य झाल्यामुळे संपूर्ण ग्रामवासीयांची मदार शासनाच्या पाणीटंचाई निवारणावर आहे ग्रामपंचायतीकडे ४३ हातपंप व सहा सार्वजनिक विहिरी उपलब्ध असून व भूतो न भविष्यती’ अशी पाणीटंचाई निर्माण झाली असताना ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा हेकेखोर स्वभावामुळे पाणीटंचाईचेही राजकारण करण्यात येत असून, गावातील जुन्या वस्तीमध्ये ग्रामपंचायतजवळील हातपंप तब्बल तीन महिन्यांपासून केवळ दुरुस्तीअभावी बंद पडले आहे. सदर हातपंपाला भरपूर पाणी असून, नादुरुस्तीमुळे सदर हातपंपाचे पाइप जंगल्यामुळे व त्याची कुंडी तुटल्याचे दुरुस्ती पथकाकडून पंधरा दिवसांपूर्वी सांगण्यात आले होते. सदर हातपंपाचा सिमेंट ओटा आजच तोडून कुंडी मोकळी करा उद्या येऊन नवीन कुंडी व पाइप हातपंपाच्या ओटा तेवढा खोदून पडलेला आहे. त्याचप्रमाणे गावातील अजूनही बरेचसे हातपंप बंद व नादुरुस्त अवस्थेत आहेत. केवळ एकच हातपंप असा आहे, की तो जर बंद पडला तर दुसऱ्याच दिवसी दुरुस्ती पथक येऊन पूर्ववत चालू करण्यात येतो, त्यामुळे ग्रामवासीयांकडून आपापल्या परीने पाणीटंचाईवर मात करण्यात येत असून, कुणी डोक्यावर, सायकलवर व कित्येक शेतकरी बैलगाडीने गावाबाहेरून पाणी आणत आहेत. तरी पाणीटंचाईवर राजकारण करणाऱ्या सदर ग्रामपंचायतच्या संबंधितांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य ती दखल घेऊन कारवाई करण्याची तसेच येथील पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यात याव्या, अशी मागणी येथील त्रस्त नागरिकांकडून केल्या जात आहे.