बुलडाणा, दि. १६- अवकाळी पावसामुळे यंदा सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला, तर यातून बचावलेल कापूस उत्पादक शेतकर्यांचे लक्ष कापूस विक्रीतून नफा मिळविण्याकडे लागले आहे; मात्र दसरा झाल्यानंतर अद्यापही कापूस खरेदी केंद्र चालू न झाल्यामुळे शेतकर्यांची चिंता वाढली आहे.कृषी विभागाच्या नियोजनानुसार जिल्ह्यात साडेसात लाख हेक्टवरवर खरिपाची पेरणी करण्यात आली. यात १ लाख ४७ हजार ५७ हेक्टरवर कापशीची पेरणी करण्यात आली. यात घटाखाली मोताळा, नांदुरा, शेगाव, खामगाव, मलकापूर, जळगाव जामोद आणि बुलडाणा या तालुक्यांमध्ये कपशीचे क्षेत्र जास्त आहे. गत तीन वर्षांपासून जिल्ह्यात अल्प पर्जन्यमानामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती; मात्र यंदा मान्सून वेळेवर पडल्यामुळे त्याचा फायदा जिल्ह्यातील शेतकर्यांना झाला. त्यामुळे जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकर्यांना मोठा फायदा झाला. दरवर्षी कपाशी खरेदीला दसर्यानंतर प्रारंभ होतो. त्यामुळे शेतकर्यांच्या हातात दिवाळी सणादरम्यान पैसा खेळता असतो; मात्र यंदा दसरा सण झाल्यानंतरही अद्यापही जिल्ह्यात शासनाकडून कापूस खरेदी केंद्र सुरू झाले नाही. परिणामी ग्रामीण भागात खासगी स्वरूपात कमी भावात शेतकर्यांकडून कापूस खरेदी केली जात आहे.राज्यात कापूस खरेदीची संमती मिळावी, यासाठी सीसीआयने राज्य शासनाकडून परवानगी मागितली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत परवानगी मिळण्याची शक्यता आहे. तर नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला सीसीआयकडून कापूस खरेदी केली जाणार, अशी आशा शेतकर्यांना लागली आहे. दोन लाख गाठींचे उत्पादन होण्याची शक्यताराज्यात ३९ हेक्टरवर कपाशीची पेरणी करण्यात आली. यामुळे राज्यात किमान ७0 ते ७५ लाख गाठींचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात कपाशी क्षेत्र १ लाख ४७ हजार ५७ हेक्टर आहे. यंदा पडलेल्या समाधानकारक पावसाचा लाभ कपाशी उत्पादकांना मिळणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कपाशी उत्पादनात वाढ होऊन २ लाख गाठीपर्यंत उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शेतक-यांना कापूस विक्रीची प्रतीक्षा
By admin | Published: October 17, 2016 2:33 AM