‘मलगी फाट्यावर गतिरोधक बसवा ! ’
बुलडाणा : चिखली तालुक्यातील मलगी फाट्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी निवृत्ती भानुदास पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. या मार्गावर माेठ्या प्रमाणात वाहतूक असते. अपघाताची शक्यता आहे.
‘गरीब विद्यार्थ्यांना माेफत प्रवेश द्या ! ’
बुलडाणा : काेराेनाच्या काळात गरीब विद्यार्थ्यांकडून फी न घेता माेफत प्रवेश देण्याची मागणी स्वाभिमानी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आंदाेलन करण्याचा इशारा राणा चंदन यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
म्युकरमायकोसिस जनजागृतीची गरज
बुलडाणा : कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांवर ‘म्युकरमायकोसिस’ या आजाराने हल्ला चढविला आहे. म्युकरमायकोसिसवर नियंत्रण गरजेचे असून, या आजाराच्या प्रतिबंधासाठी व्यापक जनजागृतीची गरज आहे.
‘त्या’ कुटुंबांचा कर माफ करण्याची मागणी
सिंदखेडराजा : कोरोना संसर्गाने गृह प्रमुख गमावलेल्या कुटुंबांचा कर पालिकेने माफ करावा, अशी मागणी शहर काँग्रेसच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कोरोना संसर्गाने शहरात अनेकांचा मृत्यू झाला.
आंतरपिकावर शेतकऱ्यांचा भर
धामणगाव धाड : परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी पेरूच्या बागेत आंतर पीक म्हणून मल्चिंग पेपरवर ठिबक सिंचनाद्वारे मिरचीची लागवड केली आहे. सध्या मिरचीचे पीक बहरले आहे. परिसरातील शेतकरी या पिकातून लाखाेचे उत्पन्न घेत आहेत.
प्रवासी निवारा उभारण्याची मागणी
किनगाव जट्टू : येथील बसस्थानकात प्रवासी निवारा नसल्याने प्रवाशांना माेठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन तातडीने प्रवासी निवारा उभारण्याची मागणी हाेत आहे़
बचतगटाच्या महिलांना निधी वाटप
राहेरी बु : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सिंदखेडराजा तालुक्यातील देवखेड येथील महिला बचतगटांना तीन लाख रुपये देण्यात आले. बी-बियाणे व खते खरेदी करण्यासाठी पाच समूहांना प्रत्येकी ६० हजार रुपये देण्यात आले.