शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

नऊ महिन्यापासून घरकुलाची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 2:55 PM

नियोजनाअभावी नागरिक घरकुलाच्या प्रतिक्षेत असल्याची वास्तविकता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: बेघर कुटूंबांना हक्काचे घर उपलब्ध व्हावे यासाठी शासनामार्फत पंतप्रधान घरकुल योजना कार्यान्वीत केली. मात्र नियोजनाअभावी असंख्य नागरिक घरकुलाच्या प्रतिक्षेत असल्याची वास्तविकता आहे.या योजनेअंतर्गत राज्यातील बेघर कुटुंबांना घरे देण्यात येणार आहेत. शहरी भागात मात्र या योजनेच्या अंमलबजावणीकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. अमरावती विभागातील ८१ हजार कुटूंबांना घरकुले मिळणार आहेत. त्यापैकी जिल्हयातील आकडाही कमी नाही. पालिका प्रशासनाने नियोजनही केले. मात्र सरकारकडूनच निधी प्राप्त होत नसल्याने घरकुलांचे बांधकाम रखडले आहे. पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत मंजूर प्रकल्पांसाठी म्हाडा, स्थानिक स्वराज्य संस्था, सरकारी तसेच निमसरकारी संस्थांना नाममात्र दरात सरकारी जमिनी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तर काही ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच अल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांसाठी मुद्रांक शुल्कात सवलत देण्यात आली आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या सवलती देऊन उपाययोजना केल्यानंतरही संबंधित यंत्रणा अपेक्षित कार्यवाही करत नसल्याची वास्तवकिता आहे. एकंदरीत मुख्यमंत्र्यांच्या आदेशालाच केराची टोपली दाखवण्यात आली आहे.

जिल्हयात १३ हजार घरकुलाचे प्रस्ताव प्रलंबीतबुलडाणा जिल्हयातील विविध नगर पालिका क्षेत्रातील १३ हजार ८९१ नागरिकांचे प्रस्ताव प्रलंबीत आहेत. नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी वेळेत शासनाकडे निधी व मंजूरीसाठी प्रस्ताव सादर करूनही याबाबत कुठलाही निर्णय अद्याप देण्यात आला नसल्याची खंत आहे. यामुळे गरजू लाभार्थी घरकूलापासून वंचित राहिले आहेत.

प्रत्येकाला स्वत:चे हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाने बेघरांना घर ही संकल्पना आणली आहे. याअंतर्गत संबधित व्यक्तीच्या जागेवर घरकूल बांधल्या जाणार आहे. शासनाकडे पालिका क्षेत्रातील १४९३ व्यक्तींचे घरकुलाचे प्रस्ताव मंजूरीसाठी पाठवले आहेत.- धनंजय बोरिकरमुख्याधिकारी, खामगाव.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव