शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

कर्जमाफीच्या ‘ग्रीन’ यादीची प्रतीक्षाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:33 AM

बुलडाणा: छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना कर्जमाफीचे जिल्ह्यात २ लाख ५0 हजार ७४५ लाभार्थी कुटुंब असून, १८ ऑक्टोबरपासून कर्जमाफीची रक्कम बँक खात्यात जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते; मात्र अद्यापपर्यंत कर्जमाफीच्या लाभार्थींची यादी ‘प्रक्रिये’मध्येच अडकलेली  आहे.  कर्जमाफीच्या ‘ग्रीन’ यादीच्या या  गोलमालमुळे शेतकर्‍यांना आपले नाव लाभार्थी यादीत शोधता शोधता नाकीनऊ येत आहेत. 

ठळक मुद्देजिल्ह्यात २ लाख ५0 हजार कुटुंब लाभार्थी लाभार्थींची यादी अडकली ‘प्रक्रिये’मध्ये

ब्रम्हानंद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना कर्जमाफीचे जिल्ह्यात २ लाख ५0 हजार ७४५ लाभार्थी कुटुंब असून, १८ ऑक्टोबरपासून कर्जमाफीची रक्कम बँक खात्यात जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते; मात्र अद्यापपर्यंत कर्जमाफीच्या लाभार्थींची यादी ‘प्रक्रिये’मध्येच अडकलेली  आहे.  कर्जमाफीच्या ‘ग्रीन’ यादीच्या या  गोलमालमुळे शेतकर्‍यांना आपले नाव लाभार्थी यादीत शोधता शोधता नाकीनऊ येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत १ एप्रिल २00९ नंतर पीक कर्ज व मध्यम मुदत कर्ज घेतलेले व ३0 जून २0१६   पर्यंत थकबाकीदार शेतकर्‍यांचे मुद्दल व व्याजासह  दीड लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करण्यात आलेले आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात २२ सप्टेंबर या मुदतीपर्यंत कर्जमाफीचे ऑनलाइन ४ लाख ६७ हजार ४५७ शेतकर्‍यांनी नोंदणी केली. त्यामध्ये  जिल्ह्यातील २ लाख ५0 हजार ७४५ लाभार्थी कुटुंबांची संख्या आहे. यामध्ये शेतकर्‍यांकडून ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर, अर्जांची छाननी व लेखा परीक्षण पूर्ण करण्यात आले. त्यानंतर ऑडिट केलेल्या अर्जांंच्या फायली शासनाकडे सादर करण्यात आल्या. यामध्ये जिल्हा राज्यात आघाडीवर असल्याचा गवगवा प्रशासनाकडून करण्यात आला. राज्यात १८ ऑक्टोबरपासून कर्जमाफीची रक्कम बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यानुसार  दीड लाखापर्यंत कर्ज माफ झालेल्या शेतकर्‍यांना थेट मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीचे ‘कर्ज बेबाक’ प्रमाणपत्र १८ ऑक्टोबर रोजी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांच्या नावाची हिरवी (ग्रीन) यादी व कागदपत्रांमध्ये त्रुटी असलेल्या शेतकर्‍यांची पिवळी (येलो) आणि अपात्र शेतकर्‍यांची लाल (रेड) यादी छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेच्या संकेतस्थळावर व संबंधित बँकाकडे  देण्यात येणार होती; मात्र अद्यापपर्यंंत सदर यादी जाहीर करण्यात आली नाही. कर्जमाफीच्या लाभार्थींंची यादी अद्यापपर्यंंत प्रोसेसमध्येच अडकल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत. 

प्रमाणपत्र मिळविलेले शेतकरी संभ्रमातछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २0१७ अंतर्गत प्रतिनिधिक स्वरूपात कर्जमाफी प्रमाणपत्र, साडी-चोळी, कुर्ता देऊन शेतकर्‍यांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन १८ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात जिल्ह्यातील २१ शेतकरी कुटुंबाचा सन्मान करून मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीचे ‘कर्ज बेबाक’ प्रमाणपत्र वितरित करण्यात आले; मात्र लाभार्थींंची यादीच अद्यापपर्यंंत समोर आली नसल्याने प्रमाणपत्र मिळविलेले शेतकरीसुद्धा कर्जमाफीच्या लाभापासून संभ्रमात आहेत. 

शेतकरी झिजवताहेत बँकाचे उंबरठे दिवाळीच्या मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत पात्र शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार होती; परंतु आतापर्यंंत जिल्ह्यातील एकाही शेतकर्‍याच्या बँक खात्यात कर्जमाफीचा लाभ जमा झाला नाही. त्यामुळे शेतकरी संबंधित बँकेचे उंबरठे झिवजत आहेत. शेतकरी कर्जमाफीचा लाभ पाहण्यासाठी दररोज बँकेत चकरा मारत आहेत. बँकेत विचारपूस केल्यानंतर कर्मचारीसुद्धा योग्य माहिती शेतकर्‍यांना देत नसल्याने बँक कर्मचारी आणि शेतकर्‍यांमध्ये वाद उद्भवत आहेत. 

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत लाभार्थींंची यादी तयार करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. लवकरच लाभार्थींंची यादी संबंधित बँकेकडे पाठवून लाभार्थी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात कर्जमाफीचा लाभ जमा करण्यात येईल. - नानासाहेब चव्हाण,जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, बुलडाणा.-

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी