शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

सहा हजार गॅस ग्राहक वेटिंगवर

By admin | Published: September 03, 2014 12:03 AM

गौरी गणपतीच्या दिवसात जिल्ह्यात गॅस सिलिंडरची तीव्र टंचाई निर्माण झाली असून सहा हजार ग्राहक वेटिंगवर आहेत. तुटवडा निर्माण झाल्याने गरजवंतांना काळ्या बाजारातून ८०० रुपये दराने सिलिंडर खरेदी करावे

सणासुदीचे दिवस : काळ्या बाजारात ८०० रुपये दराने विक्रीयवतमाळ : गौरी गणपतीच्या दिवसात जिल्ह्यात गॅस सिलिंडरची तीव्र टंचाई निर्माण झाली असून सहा हजार ग्राहक वेटिंगवर आहेत. तुटवडा निर्माण झाल्याने गरजवंतांना काळ्या बाजारातून ८०० रुपये दराने सिलिंडर खरेदी करावे लागत आहे. सणासुदीच्या दिवसात ग्राहकांना गॅससाठी एजन्सीपुढे रांगा लावाव्या लागत आहे. यवतमाळ जिल्ह्यात एक सिलिंडरधारक ग्राहकांची संख्या १ लाख ६९ हजार १०४ आहे. तर दोन सिलिंडरधारकांची संख्या ७८ हजार १०७ आहे. या ग्राहकांना २१ एजन्सीमधून सिलिंडरचे वितरण केले जाते. बुकींग केल्यानंतर दोन ते तीन दिवसात मिळणारा सिलिंडर गेल्या काही दिवसांपासून आठ-आठ दिवस प्रतीक्षा करूनही मिळत नाही. सध्या गौरी गणपतीचे दिवस आहेत. त्यामुळे अनेकांना अतिरिक्त सिलिंडरची आवश्यकता भासते. अशा स्थितीत यवतमाळात सहा हजार ग्राहक वेटींगवर आहेत. सिलिंडरसाठी ग्राहकांच्या एजन्सीसमोर रांगा लागल्या असून तत्काळ सिलिंडर देण्यास संबंधित एजन्सीने नकार दिला आहे. त्यामुळे हमरीतुमरीचे प्रसंगही पाहावयास मिळतात.यवतमाळ जिल्ह्याला चंद्रपूर येथील युनीटवरून सिलिंडरचा पुरवठा होतो. या युनीटला गुजरातवरून एलपीजी गॅसचा पुरवठा होतो. मात्र काही दिवसांपासून गुजरातमधून एलपीजी गॅस पुरवठा झाला नाही. त्यामुळे गॅस युनिटचे काम खोळंबले. ग्राहकांना मागणीनुसार लागणारे सिलिंडर उपलब्ध झाले नाही. त्यामुळे वेटींगची संख्या वाढत गेली. यवतमाळात मागणीच्या तुलनेत केवळ ६० टक्के सिलिंडर उपलब्ध होत आहे. मागणी अधिक आणि पुरवठा कमी, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे ग्राहक चांगलेच वैतागले आहे. सणासुदीच्या दिवसात गॅस न मिळाल्यास स्वयंपाक कसा करावा, असा प्रश्न गृहिणींना पडला आहे. (शहर वार्ताहर)