शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
5
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
6
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
7
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
8
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
9
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
10
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
11
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
12
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
13
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
14
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
15
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
16
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
17
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
18
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!
19
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
20
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार

नांद्रा येथे पाण्यासाठी महिलांची भटकंती

By admin | Published: May 15, 2017 12:36 AM

नांद्रा : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी काही ठोस उपाययोजना करण्याऐवजी सर्वच स्तरावरून निष्फळ धावपळ होत आहे. त्यामुळे नांद्रा येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांद्रा : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी काही ठोस उपाययोजना करण्याऐवजी सर्वच स्तरावरून निष्फळ धावपळ होत आहे. त्यामुळे नांद्रा येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महिलांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. गुराढोरांसह नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. आतापर्यंत पाणीपुरवठ्याच्या विहिरीला पुरेसे पाणी होते. तेव्हा लाइनचा पुरवठा होत नसल्याने व सतत बिघाडाने पाणीटंचाई होती. यावर उपाय म्हणून ग्रामपंचायतीने दोन महिन्यांपूर्वी तहसीलदारांना निवेदन देऊन नांद्रा गावाकडून लाइन जोडून देण्याची विनंती केली होती, ज्यामुळे जास्त विद्युत पुरवठा होऊन सतत होणाऱ्या विद्युत बिघाडावर लक्ष देणे सोपे होत होते. यावर तहसीलदार यांनी महावितरणला पत्र दिले व ही जोडणी न केल्यास यामुळे निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईला व समस्येला आपण जबाबदार राहाल, असे बजावले होते. तहसीलदाराच्या या पत्राला महावितरणने केराची टोपली दाखवत कोणतीच उपाययोजना केली नाही. त्यामुळे पाणी असूनही विद्युत पुरवठ्याअभावी नांद्रावासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. त्यानंतर काही दिवसांनी ग्रामपंचायतने २००० फूट शेतकऱ्याचा केबल वायर टाकून विद्युतची व्यवस्था केली; परंतु तोपर्यंत विहिरीचे पाणी कमी झाले. या अगोदर नांद्रा येथील पाणीटंचाईबाबत संबंधितांचे लक्ष वेधले असता, लोणार तहसीलदार तथा गटविकास अधिकारी यांनी गावाला भेट देऊन विहिरीची खोली वाढविण्याचा सल्ला दिला. अगोदर विद्युतअभावी तर आता पाण्याअभावी गावात पाणीटंचाई कायम आहे.