धरणसुरक्षा व पूरनियंत्रण लक्षात घेता प्रकल्पाचे तीन दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्यात येणार असून ९८० क्युसेक पाण्याचा विसर्ग खडकपूर्णा नदीपात्रात सोडण्यात येणार असल्याची माहिती शाखा अभियंता रोहित मोर्या यांनी दिली़
देऊळगाव राजा तालुक्यातील निमगाव गुरू, रस, सावंगी टेकाळे, टाखरखेड वायाळ, टाखरखेड भागिले, सिंदखेडराजा तालुक्यातील निमगाव वायाळ, हिवरखेड पूर्णा, राहेरी, तडेगाव, ताडशिवणी, देवखेड, पिपळगाव कुडा, लिंगा, लोणार तालुक्यातील खापरखेडा, रायगव, सावरगाव तेली, जिंतूर तालुक्यातील किर्ला, दुधा, सासखेडा, लिंब खेडा, हनुमंत खेडा, अस्वद, टाखळखोपा, इंचा कानडी देवठाणा, वझर भामटे, शेनगाव तालुक्यातील धानोरा या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे़ बुलडाणा पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी तिरमारे, प्रकल्प निरीक्षक राहुल गुंजाळ, शाखा अभियंता रोहित मोर्या, पुरुषोत्तम भागीले, बी़ एस. खार्डे, योगेश भागीले, आदी मंडळी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.