देऊळगाव मही : कोरोनाकाळात आपल्या जिवाची पर्वा न करता आरोग्य सेविकांनी रुग्णांची सेवा केली़. शासनाने अत्यल्प मानधन देऊन तीन ते चार उपकेंद्रांचा प्रभार सोपवून काम करून घेतले. आता ‘काम सरो’प्रमाणे जिल्ह्यात उपकेंद्रांवर काम करणाऱ्या चोवीस आरोग्य सेविकांना कार्यमुक्त करण्यात येणार आहे. या निर्णयाचा कंत्राटी आराेग्य सेविकांनी निषेध केला आहे, तसेच सेवा समाप्तीच्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास १४ सप्टेंबरपासून उपाेषण करण्याचा इशारा आराेग्य सेविकांनी ३ सप्टेंबरला जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात दिला आहे.
जिल्हा परिषदेसमोर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या आरोग्य सेविकांच्या सेवा समाप्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय मागे घेण्याच्या मागणीसाठी कंत्राटी आराेग्य सेविवकांनी ३ सप्टेंबर राेजी जिल्हा परिषद गाठली हाेती़. यावेळी त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले आहे. निवेदनात नमूद आहे की, राज्यात २००७ पासून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ३ हजार २०७ आरोग्य सेविका अत्यल्प मानधनात कुठलीही तक्रार न करता काम करीत आहेत. एकीकडे अनेक संस्थांमध्ये हजारो पदे रिक्त आहेत आणि कंत्राटी आरोग्य सेविका यांच्याकडे तीन-तीन चार-चार उपकेंद्रांचा प्रभार देऊन त्यांच्याकडून काम करून घेतले आहे. यावर कळस म्हणजे बुलडाणा जिल्ह्यातील एक-दोन कंत्राटी आरोग्य सेविका यांच्याकडे एल.एच.व्ही.व फार्मासिस्टच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ओपीडीचासुद्धा असे एकूण चार प्रभार आरोग्य सेविका सांभाळत आहे. अशा अनेक ठिकाणी या आरोग्य सेविका कंत्राटी व नियमित आरोग्य सेविकेचा पदभार सांभाळत आहेत; परंतु शासनाने सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या मंजूर प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यामध्ये ५९७ आरोग्य सेविका यांची पदे नामंजूर करून त्यांना कार्यमुक्त करून अन्याय केला आहे. एकीकडे कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असताना हा निर्णय चुकीचा असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
आंदाेलनाचा इशारा
जीव धाेक्यात घालून काेराेना रुग्णांची सेवा केल्यानंतर आता कार्यमुक्त करण्यात येत आहे. त्यामुळे, कार्यमुक्तीचा आदेश तत्काळ रद्द करण्याची मागणी कंत्राटी आराेग्य सेविकांनी केली आहे. मागणी मंजूर न झाल्यास संगीता पऱ्हाड आणि कविता केवट यांच्या नेतृत्वात दि.१४ सप्टेंबरपासून उपोषण करणार असा, इशारा देण्यात आला आहे.
070921\img-20210907-wa0049.jpg
????? ???? ???? ?????? ????????