मुस्लीम सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शे. करामत शे. रहेमतउल्ला यांनी यासंदर्भाने तहसीलदारांकडे तक्रार दिली होती. यामध्ये स्वस्त धान्य दुकानदार लोखंडे विविध कारणे पुढे करून शिधापत्रिकाधारकांना कमी प्रमाणात अन्नधान्याचे वाटप करीत आहेत. यासंदर्भाने लाभार्थ्यांनी विचारणा केली असता त्यांना अरेरावी करणे व धान्यवाटप न करण्याची धमकी दिली असल्याचा आरोप केला आहे. दुकानदाराच्या या वागणुकीमुळे तीव्र रोष व्यक्त होत असून महामारीच्या काळात याप्रकारे पिळवणूक होत असल्याने अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुरवठा विभागाने तातडीने कारवाई करावी, तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानांमध्ये नियमाप्रमाणे अन्नधान्याचे वाटप होण्यासाठी दुकानाच्या दर्शनी भागात दरपत्रक लावणे, मालाची पावती देणे बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी मुस्लीम सेवा संघाने केली आहे. या मागणीची दखल घेत तहसीलदारांनी पुरवठा विभागास चौकशीचे आदेश दिले आहेत.
असे आहे मे महिन्यातील धान्य वितरण
अंत्योदय (नियमित)
गहू २१ किलो प्रतिकार्ड (मोफत)
तांदूळ १४ किलो प्रतिकार्ड (मोफत)
साखर १ किलो प्रतिकार्ड (२० रुपये किलो)
प्राधान्य कुटुंब (नियमित)
गहू ३ किलो प्रतिव्यक्ती (मोफत)
तांदूळ २ किलो प्रतिव्यक्ती (मोफत)
एपीएल शेतकरी (नियमित)
गहू ४ किलो प्रतिव्यक्ती (२ रु. किलो)
तांदूळ १ किलो प्रतिव्यक्ती (३ रु. किलो)
पीएमजीकेएवाय अंत्योदय
गहू ३ किलो प्रतिव्यक्ती (मोफत)
तांदूळ २ किलो प्रतिव्यक्ती (मोफत)
चणाडाळ १ प्रतिकार्ड (उपलब्धतेनुसार) (मोफत)