वरवट बकाल : पाणी फाऊंडेशनतंर्गत निरीक्षणार्थी घेऊन जात असलेल्या एका चार चाकी वाहनाचा वरवट बकाल ते सोनाळा रोड वर माकड आडवे आल्याने अपघात झाला. ही घटना सकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. यात दोघे गंभीर झाल्याचे समजते.
संग्रामपूर तालुक्यातील ३४ गावांनी पाणी फाऊंडेशनच्या वाटर कप स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. श्रमदानातून ग्रामस्थ आपले गाव पाणीदार करण्यासाठी एकवटले आहेत. त्यांनी श्रमदानातून केलेल्या कामांचे निरीक्षण करण्यासाठी पाणी फाऊंडेशनची जल संधारण टीम हि गेल्या दोन महिन्या पासून संग्रामपूर तालुक्यात गावोगावी भेटी देत आहे. ,२३ एप्रिल रोजी सकाळी ७वाजेच्या सुमारास वरवट बकाल बसथांबा येथून सोनाळा मार्गावर वाहन क्रमांक एम एच २८ व्ही ७९५१ महिंद्रा बोलेरो या वाहनात पाणी फाऊंडेशन चे निरीक्षक प्रवास करीत होते.
दरम्यान, वरवट बकाल येथील बोडखे यांच्या शेताजवळ सोनाळा मार्गावर वाहनाच्या समोर अचानक माकड आडवे आले. वाहन चालक यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने सदर वाहन हे रस्ता लागत असलेल्या झाडाला धडक दिली. या मध्ये विजय झाडे वय ३८ रा मांडवा अमोल सोनोने वय २६ रा मोताळा यांना अकोला येथे पुढील उपचाराकरिता येथील वैद्यकीय अधिकारी यांनी रेफर केले. तर किरकोळ जखमी झालेल्या वैष्णवी कुलत यांना प्रथमोपचारा नंतर सुटी देण्यात आली.