शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

पाणी परिषद : नदीजोड प्रकल्प लोकचळवळ व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 2:03 PM

नदीजोड प्रकल्प लोकचळवळ होऊन वैनगंगेचे पाणी हे पैनंगगेत आणण्यासाठी प्रभावी जनआंदोलन उभे राहावे, अशी अपेक्षा मेहकर तालुक्यातील लव्हाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या पाणी परिषदेत व्यक्त करण्यात आली.

बुलडाणा/मेहकर: हवामानामध्ये होणारे बदल आणि त्यामुळे सातत्याने पडणारा दुष्काळ पाहता तुटीच्या नदी खोऱ्यात जादा पाणी असलेल्या खोऱ्यातील पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने उपयुक्त असलेला वैनगंगा ते नळगंगा नदीजोड प्रकल्प लोकचळवळ होऊन वैनगंगेचे पाणी हे पैनंगगेत आणण्यासाठी प्रभावी जनआंदोलन उभे राहावे, अशी अपेक्षा मेहकर तालुक्यातील लव्हाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या पाणी परिषदेत व्यक्त करण्यात आली.बुलडाण्याचे खा. प्रतापराव जाधव, जिजाऊ जलसमृद्धी नदीजोड प्रकल्प समितीचे विकास डाळीमकर, प्रवीण खंडेलवाल, श्याम पठाडे, भास्कर कदम, ज्ञानेश्वर डहाके यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या पाणी परिषदेच्या अध्यक्षस्थानी बुलडाणा अर्बनचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी पाटबंधारे मंत्री भारत बोंद्रे, नदीजोड तज्ज्ञ डॉ. स्वामी, नागपूर येथील जलदूत डॉ. सतीश चव्हाण, महाबीजचे संचालक वल्लभराव देशमुख, पूर्ती ग्रुपचे जल सल्लागार माधवराव कोटस्थाने, नजीजोड तज्ज्ञ सुरेंद्र खपके प्रामुख्याने उपस्थित होते.वैनगंगा ते नळगंगा नदीजोड प्रकल्पाचा डीपीआर तयार झालेला आहे; मात्र घाटावरील भागाला याचा लाभ होणार नाही. पैनगंगा प्रकल्पापर्यंत हे पाणी आणल्यास घाटावरील भागासह अगदी यवतमाळ आणि मराठवाड्यालाही याचा लाभ होऊ शकतो. त्यादृष्टीने नदीजोड प्रकल्पाबाबत जनमानसात जागृती होऊन जिल्ह्यात ही एक लोकचवळ म्हणून उभी राहावी यासाठी ही पाणी परिषद आयोजित करण्यात आली असल्याचे यावेळी खा. प्रतापराव जाधव यांनी स्पष्ट केले.हा प्रकल्प मार्गी लागल्यास विदर्भातील आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांचा पाणी प्रश्न मिटण्यास मदत होईल. तापी आणि गोदावरी हे दोन्ही नदी खोरे जोडल्या जाऊन पाण्याची उपलब्धता या भागात निर्माण होऊन शेतकऱ्यांकडे सुबत्ता येईल, असे महाबीजचे संचालक वल्लभराव देशमुख यांनी सांगितले. यासोबतच गोसेखुर्द ते नळगंगा या ४०० किमी अंतरामधील बरेच बारकावे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, नदीजोड तज्ज्ञ सुरेंद्र खपके म्हणाले की, गोसेखुर्दमधून वाहून जाणाºया अतिरिक्त पाण्यापैकी १०० टीएमसी पाणी मिळाल्यास विदर्भातील आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांची पाण्याची समस्या सुटेल. बुलडाणा जिल्ह्यालाही यातून जवळपास २५ टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकले. वैनगंगेचे हे पाणी पेनटाकळी प्रकल्पात आणण्यासाठी अवघड अशा ४७ किमी लांबीच्या पट्ट्याचे सर्वेक्षण अपेक्षित आहे. पाणी प्रश्नावर सजग असलेल्या खा. प्रतापराव जाधव यांनी त्यासाठी स्वत:च्या विकास निधीतून ५ लाख रुपये देऊन या ४७ किमीच्या डीपीआरसाठी पुढाकार घेतला असल्याचे नदीजोड प्रकल्पाचे तज्ज्ञ सुरेंद्र खपके यांनी सांगितले. त्यामुळे आता प्रत्येकाने कामाला लागून ही लोकचवळ उभी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी जल सल्लागार माधवराव कोटस्थाने, जलदूत सतीश चव्हाण यांनीही उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले.(प्रतिनिधी)

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाMehkarमेहकरWaterपाणीriverनदी