धामणगाव बढे : मोताळा तालुक्यातील पान्हेरा येथील गावकरी दुष्काळाविरुद्ध लढण्यासाठी सज्ज झाले असून पाणी फाऊंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेनिमित्त प्रत्यक्ष श्रमदानास गावकºयांनी प्रारंभ केला आहे.लोकांच्या मनसंधारणातून जलसंधारणाकडे वळविणाºया व त्यातून शेकडो खेडी पाणीदार करणाºया सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेला ८ एप्रिल रोजी राज्यात प्रारंभ झाला. मोताळा तालुक्यातील १३ गावे यावर्षी या स्पर्धेत सहभागी झालेली आहेत. ७ एप्रिलच्या मध्यरात्री १२ वाजता पान्हेरा गावकºयांनी प्रत्यक्ष श्रमदानास सुरुवात केली. गावालगतच्या शिवमळा टेकडीवर गावकरी प्रत्यक्ष श्रमदान करीत आहे. त्यामध्ये अबालवृद्ध, महिला, पुरुष उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. गावकºयांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे यासाठी विविध माध्यमातून जनजागृती केली जात आहे. पाणी फाऊंडेशन, कृषी विभाग, तालुका प्रशासन नियमीत गावकºयांना मार्गदर्शन करीत आहे. गावातील युवक विजय भगत, वैभव चौधरी, प्रतिक किन्होळकर, भारत वैराळकर, सुधाकर लोटकर, उमेश वैराळकर यांनी पाणी फाऊंडेशन तर्फे आयोजित प्रशिक्षणात सहभाग घेतला होता. गावात सध्या युवकाची चमू जनजागृती व प्रचार, प्रसार करीत आहे. गावामध्ये गट-तट व राजकीय भेद विसरुन गावकरी एकत्र आले आहे. महिलांचा मोठा सहभाग, प्रशासनाची साथ, युवकांचे काटेकोर नियोजन यामुळे पान्हेरा वासियांची वाटचाल गाव पाणीदार करण्याकडे सुरू आहे. तसा संकल्पच गावकºयांनी केला आहे. सकाळीच पान्हेरा ग्रामस्थ शिवमळा टेकडीवर श्रमदानासाठी एकत्र येतात. यामाध्यमातून दुष्काळ कायमचा हद्दपार करण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. जलसंधारणाची मोठी कामे या गावात करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
पाण्याचे नियोजन करणारी ग्रामपंचायतसार्वजनिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत कुठलाही भेदभाव न करता एकसमान वाटप व्हावे यासाठी सरपंच सुनिल वैराळकर व पदाधिकाºयांनी फक्त अर्धा इंची कनेक्शनद्वारे गावकºयांना घरोघरी पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्याची काटेकोर अंमलबजावणी गावात केली. त्यामुळे समान कनेक्शनद्वारे पाणीपुरवठा करणारी पान्हेरा ग्रामपंचायत ही तालुक्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे.