डोणगाव : पावसाळ्यात दुषीत पाण्यामुळे जलजन्य आजार उद्भवतात. हे जलजन्य आजार टाळण्यासाठी स्थानिक लंबोधर गणेश मंडळाच्यावतीने १ सप्टेंबर पासून मोफत जलतपासणी उपक्रम राबविण्यात येत आहे. पावसाळ्यात दुषीत पाण्यामुळे साथीचे आजार, जलजन्य आजार उद्भवतात. जलजन्य आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी तसेच जलजन्य आजार टाळण्यासाठी स्थानिक लंबोधर गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एक आगळावेगळा उपक्रमाचे आयोजन केले आहे. लंबोधर गणेश मंडळाच्यावतीने मोफत जलतपासणी करुन नागरिकांना जलजन्य आजाराविषयी माहिती दिल्या जात आहे. दरम्यान पाणी तपासून पाण्यात किती क्षार आहेत, पाणी िपण्यायोग्य आहे की नाही आदीविषयी नागरिकांना माहिती दिल्या जाते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष गणेश जुनघरे, गणेश घोगल, देवानंद आखाडे, देविदास खनपटे, गोपाल वायाळ, वैभव आखाडे, संजय घाटोळे, प्रशांत चोपडे, शंकर आखाडे, मोहन मोरे, रामभाऊ राऊत, रवि आढाव, विठ्ठल टाले, संग्राम लातुरकर आदी परिश्रम घेत आहेत.
लंबोधर गणेश मंडळातर्फे जल तपासणी उपक्रम
By admin | Published: September 03, 2014 8:56 PM