शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

लोणार सरोवर पाणीपातळी मोजण्यात पाण्याचीच अडचण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 11:36 AM

Lonar Sarowar : पाणी पातळी मोजण्यासाठी सरोवरामध्ये रेकॉर्ड गेज लावण्यात पाण्याचीच अडचण बुलडाणा पाटबंधारे मंडळासमोर येत आहे.

- नीलेश जोशीलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : लोणार सरोवराचा सूक्ष्मस्तरावरील अभ्यास व सरोवरातील पाण्याची शास्त्रीय दृष्टिकोनातून पाणी पातळी मोजण्यासाठी सरोवरामध्ये रेकॉर्ड गेज लावण्यात पाण्याचीच अडचण बुलडाणा पाटबंधारे मंडळासमोर येत आहे. दरम्यान, या कामासाठी ८ एप्रिल २०२१ रोजीच नाशिक येथील धरण सुरक्षा संस्थेच्या उपकरणे संशोधन विभागाने पाटबंधारे विभागाला अनुषंगिक पत्र दिले होते. मात्र लोणार सरोवरात लावण्यासाठी वेगळ्या पद्धतीचे रेकॉर्ड गेज लागणार असल्याने ते पुन्हा उपकरणे व संशोधन विभागाकडून मागवावे लागणार आहेत.दुसरीकडे स्वयंचलित पाणी पातळी मापक यंत्र मात्र पाटबंधारे विभागाला यापूर्वीच प्राप्त झाले आहे. परंतु लोणार सरोवराची पाणी पातळी कमी न झाल्यामुळे सरोवरात ते लावण्यात विभागास अडचणी येत आहेत. त्यामुळे सरोवराची पाणीपातळी कमी होण्याची वाट बुलडाणा पाटबंधारे विभाग सध्या बघत आहे. मात्र आता पावसाळा आल्याने या कामात पुन्हा व्यत्यय येण्याची शक्यता आहे.गेल्या वर्षी ९ जून रोजी लोणार सरोवराचे पाणी हॅलो अर्चिया या सूक्ष्म जीवांनी बिटा कॅराेटीन द्रव्य मोठ्या प्रमाणात सोडल्यामुळे गुलाबी झाले होते. त्यानंतर सरोवर क्षती प्रतिबंध व संवर्धनासाठी नागपूर खंडपीठात दाखल असलेल्या याचिकेच्या अनुषंगाने याची खंडपीठाने गंभीर दखल घेत सुनावणी घेतली होती. त्यावेळी सरोवरातील पाण्याची पातळी कमी-अधिक होण्याचा अद्ययावत डाटा शास्त्रीय दृष्टिकोनातून संकलित करण्याच्या उपाययोजना करण्याचे आदेश खंडपीठाने दिले होते. वन्यजीव विभागाच्या अखत्यारितील या सरोवरात अनुषंगिक बांधकाम करण्याबाबत वन्यजीव विभागाने तातडीने जुलै २०२० मध्ये परवानगी दिली होती. त्यानुषंगाने नाशिकच्या धरण सुरक्षा संघटनेच्या उपकरणे व संशोधन विभागाकडून रेकॉर्ड गेज पट्ट्या व स्वयंचलित पाणी पातळी मापक उपकरणे पाठविण्यात आली होती. मात्र प्रचलित पद्धतीच्या या पाणी मापक पट्ट्या अधिक जाडीच्या लागणार असल्याने त्या पुन्हा बोलावण्यात आल्या आहेत. स्वयंचलित उपकरण सध्या मेहकर येथील पाटबंधारे विभागामध्ये ठेवण्यात आलेले आहे.

सासू-सुनेची विहीर महत्त्वपूर्णलोणार सरोवराची पाणीपातळी कमी झाल्यानंतर सरोवरात असलेली सासू-सुनेची विहीर ही उघडी पडते. या विहिरीच्या परिसरात रेकॉर्ड गेज पट्ट्या लावाव्या लागणार आहेत. तसेच सरोवराच्या मध्यभागी सेन्सर असलेले स्वयंचलित पाणी पातळी मापक उपकरण लावावे लागणार आहे. मात्र यावर्षी सरोवराची पाणी पातळी कमी झालेली नाही. त्यामुळे तेथे ही कामे करणे पाटबंधारे विभागाला जिकरीचे ठरत असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले. यापूर्वी २०१८ मध्ये ही सासू-सुनेची विहीर पाणी कमी झाल्यामुळे उघडी पडली होती. त्यापूर्वी १९९८ मध्ये ती दृष्टिपथास पडली होती.

पाण्याचा रंग बदलण्यास झाले वर्ष पूर्णसरोवरातील पाणी गुलाबी होण्यास ९ जून रोजी एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यातच मुख्यमंत्र्यांनी फेब्रुवारी महिन्यात सरोवर विकासाला प्राधान्याची घोषणा करत निधी उपलब्ध करण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. त्यानुषंगाने माहिती घेतली असता उपरोक्त बाब समोर आली.

टॅग्स :lonar sarovarलोणार सरोवरbuldhanaबुलडाणा