लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : शहरात नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या न.प.च्या दिवाणी कोर्टाच्या मागील शुद्धीकरण प्रांगणात मंगळवारी दुपारी १.४५ वाजताच्या दरम्यान गवताला अचानक आग लागल्याची घटना घडली. या जळत असलेल्या गवताच्या धुरामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.न.प.तर्फे दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या बाजूला असलेल्या पाणीपुरवठा शुद्धीकरण करण्यात येत असलेल्या प्रांगणात सुकलेल्या गवताला अचानक आग लागली. हळूहळू ही आग मोठ्या प्रमाणावर वाढत असताना जानेफळ रस्त्यावरील व फिल्टर प्रांगणाला लागूनच असलेल्या जगदंबा हॉटेलकडे आग वळत असताना हॉटेलचालकांनी तत्काळ हॉटेलमधून पाणी टाकून आग विजविण्याचा प्रयत्न केला, तर पाणीपुरवठा फिल्टरमध्ये असलेले अग्निशामक दलाचे चालक गजू कलाल यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन आग विजविण्यात आली. फिल्टरच्या परिसरातील गवताला कोणी आग लावली, हे मात्र कळू शकले नाही. मुख्याधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
पाणीपुरवठा शुद्धीकरण प्रांगणातील गवताला आग; मोठी हानी टळली!
By admin | Published: May 17, 2017 12:33 AM