धाड : जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक अशा एकूण १ हजार ४४८ शाळा असून जवळपास १ लाख ९२ हजारांवर विद्यार्थी संख्या आहे. या पैकी अनेक शाळांमध्ये पाण्याचा ठणठणाट असल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. गत दशकात यावर्षी प्रथमच जुलै महिना कोरडा जात आहे. जिल्ह्यात कुठेही दमदार पाऊस नाही. हवेतील आद्र्रता कमी तर उन्हाची तिव्रता अधिक असल्याने उन्हाळ्यापेक्षाही जास्त चटके बसत आहेत. शाळेत बसविण्यात आलेले पिण्याच्या पाण्यासाठी हातपंप कोरडे पडले आहेत. घरुन पाण्याने भरुन आणलेल्या बॉटल शाळेत येईपर्यंतच गरम झाल्यामुळे पाणी पिण्यायोग्य राहत नाही. शाळेतील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या उन्हाळ्यापासून कोरड्या आहेत. काही जि.प.शाळेत असणार्या हातपंपाना पाणी असले तरी त्याची पातळी खोल गेल्याने मुलांची झुंबड उडते. अशीच अवस्था माध्यमिक शाळांची असून पाणी आणावे कुठून हा प्रश्न मुख्याध्यापकासमोर उभा आहे.** पोषण आहार योजनेलाही फटकाप्रत्येक शाळेत असलेली पोषण आहार योजनेलाही पाण्याचा फटका बसला आहे. हा आहार शिजवण्याएवढा पाणीसाठा उपलब्ध करुण्याची कसरत मुख्याध्यापकांना करावी लागत आहे.** दरवर्षी जुनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होणारा पाऊस महिना उलटला तरी यावर्षी पडेना. टिनपत्राच्या खोलीतील शिक्षण लहान मुलांना त्रास देणारे ठरत असून पाण्याअभावी प्रचंड हाल होत आहेत. प्रशासनाने पाऊस पडेपर्यंत सकाळच्या सत्रातील शाळा सुरू कराव्यात. - पंजाब टेकाळे, मुख्याध्यापक, मपुमा शाळा कुंबेफळ.** पावसाने हुलकावणी दिल्यामुळे जमीनीमधील पाण्याची पातळी खालावली आहे त्यामुळे शांळामधील हातपंप व नळ योजनांना अपुरे पाणी येत आहे. याबाबत प्रत्येक शाळानिहाय आढावा घेऊन उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जाईल. - वैशाली ठग, शिक्षणाधीकारी, प्राथमिक
शाळांमध्ये पाण्याचा ठणठणाट
By admin | Published: July 13, 2014 8:27 PM