परिणामी, जिल्ह्यातील रखडलेल्या प्रकल्पांच्या कामाला चालना मिळून जिगाव प्रकल्पासाठी प्रसंगी निधी उपलब्ध होण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील हे ७ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता शेगाव येथे पोहोचतील. गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर शेगावात ते जळगाव जामोद मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीनंतर खामगाव येथे पोहोचल्यानंतर सायंकाळी खामगाव विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेऊन ते बुलडाणा येथे मुक्काम करणार आहेत.
त्यानंतर ८ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात सकाळी ९ वाजता जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रकल्पाच्या सविस्तर कामांचा आढावा घेणार आहेत. ही बैठक आटोपल्यानंतर ते बुलडाणा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीस उपस्थित राहतील. दुपारी १२ वाजता मलकापूर विधानसभा मतदारसंघाची, त्यानंतर चिखली विधानसभा मतदारसंघाची बैठक घेतील. सायंकाळी ५ वाजता ते मातृतीर्थ सिंदखेड राजा नगरीत माँ जिजाऊंच्या जन्मस्थळास भेट देतील तसेच सिंदखेड राजा विधानसभा मतदरासंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन जिल्ह्यात मजबूत करण्याच्या दृष्टीने त्यांचा हा दौरा असल्याचे सांगण्यात येत आहे.
आढावा बैठक, सायंकाळी ७.१५ ते ८.३० वाजता राखीव, रात्री ८.३० वाजता औरंगाबादकडे प्रयाण करतील.