याव्यतिरिक्त ५३८ गावांत पाणीटंचाई निवारणासाठी ५५९ विहिरी अधिग्रहित कराव्या लागणार आहेत. त्यासाठी २ कोटी ७५ लाख ८२ हजार रुपयांचा खर्च करावा लागणार आहे.
दोन तालुक्यांत टंचाईस सुरुवात
खारपाण पट्ट्यातील दोन तालुक्यांत पाणीटंचाईच्या झळा बसण्यास प्रारंभ झाला असून, नांदुरा तालुक्यात त्यामुळे नारखेड, हिंगणा भोटा, भोरवंड आणि शेगाव तालुक्यात चिंचखेड आणि जानोरी येथे त्यामुळे विहिरी अधिग्रहित कराव्या लागल्या आहेत.
८२ गावांत टँकरची गरज
यावर्षी ६८७ गावांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता असून, ८२ गावांना ८४ टँकरने पाणीपुरवठा करावा लागू शकतो. त्यादृष्टीने ६ कोटी ८४ लाख रुपयांचे पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात नियोजन करण्यात आले आहे. तूर्तास जिल्ह्यात एकही पाण्याचे टँकर सुरू नसल्याचे टंचाई निवारण विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले. दरम्यान, २०१८-२०१९ या वर्षी जिल्ह्यात तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई होती. त्या तुलनेत यंदा टंचाईचे प्रमाण कमी असल्याचे जाणवत आहे, असे सूत्रांनी सांगितले.