देऊळगावराजा (जि. बुलडाणा): : नगरपालिकेचे नियोजन कोलमडल्यामुळे शहराला २५ दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांची भटकंती वाढली असून, नगरपालिकेविरुद्ध तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. देऊळगावराजा तालुक्यात संत चोखा सागर खडकपूर्णा प्रकल्प असूनही, मराठवाड्यातील पिरकल्याणवरून पाणी पुरवठा होत आहे; परंतु नगरपालिकेची पाणीपुरवठा यंत्रणा गेल्या २0 ते २५ वर्षांपासून जीर्ण झालेली असून, त्याची सुधारणा आजपर्यंंत करण्यात आलेली नाही. कालबाह्य जलशुद्धीकरण यंत्र व प्रकल्पावरील विद्युत पंप जुनाट असून, विजेच्या कमी अधिक दाबामुळे शहराची तहान भागवताना पाणीपुरवठा विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. सध्या एप्रिल महिन्यात पिण्याचे पाण्याची गंभीर परिस्थिती आहे. शासनाकडून १३ कोटी पाणी पुरवठा योजनेला माजी नगराध्यक्ष निर्मला संतोष खांडेभराड यांनी सत्तत पाठपुरावा केल्यानंतर १ डिसेंबर २0१२ मध्ये मंजुरात मिळाली होती. या कामाचा निविदा जानेवरी २0१४ मध्ये काढण्यात आली व वर्क ऑडर मार्च २0१४ मध्ये काम सुरू करण्यात आले. सुजल निर्मल योजनेअंतर्गत खडकपुर्णा पाणीपुरवठा योजनेमधून दोन वर्षाच्या कालावधीत काम पुर्ण करण्याची र्मयादा होती, पण ही योजना आजपर्यंंत पूर्ण करण्यात आली नाही. संत चोखा सागर खडकपूर्णा प्रकल्पवरून १२ कि.मी. अंतराच्या पाइप लाइनच्या कामाची सुरुवात झाली, पण काही अंतरावर गेल्यानंतर बंद झाली आहे. त्यामुळे यावर्षीदेखील खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी नळाद्वारे शहराला मिळण्याची शक्यता जवळपास नाही. ही योजना किती दिवसांत पूर्ण होईल, या विवंचनेत शहरवासी आहेत.
२५ दिवसांआड होतोय पाणीपुरवठा
By admin | Published: April 16, 2015 12:44 AM