पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ
अंढेरा : मागील दहा ते बारा दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबीन, कपाशी, मूग, उडीद आदी पिके धोक्यात आली आहेत. नुकतेच जमिनीवर आलेली पिके वाया जाऊ नये यासाठी शेतकरी तुषार सिंचनद्वारे पाणी देऊन पिकांना वाचवण्याची धडपड करीत आहेत.
युवकांनी माळरानावर केले वृक्षाराेपण
मेहकर : तालुक्यातील बोरी येथील वृक्षप्रेमी युवकांनी गावातील माळरानावर निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सुमारे ५० वृक्षांची लागवड केली आहे. मागील काही दिवसांपासून निसर्गाचे संतुलन बिघडले आहे. या वृक्षांचे संवर्धन करण्याचा संकल्पही युवकांनी केला आहे.
कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांचा सत्कार
देऊळगाव राजा : येथील पंचायत समिती सभागृहात १ जुलै रोजी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी रब्बी हंगामात राबविण्यात आलेल्या पीक स्पर्धेत यशस्वी झालेल्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
माेताळा तालुक्यात चाेरट्यांचा हैदाेस वाढला
माेताळा : तालुक्यात गत काही दिवसांपासून चाेरट्यांचा हैदाेस वाढला आहे. शहरातील एका काॅम्प्लेक्समध्ये असलेल्या गुदामातून चाेरट्यांनी १५ कट्टे तूर लंपास केली हाेती. पाेलिसांनी चाेरट्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
खंडित वीजपुरवठ्याने ग्रामस्थ त्रस्त
डाेणगाव : परिसरात काही दिवसांपासून वीजपुरवठा वारंवार खंडित हाेत असल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. सध्या वातावरणात बदल झाल्याने उकाडा जाणवत आहे. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी हाेत आहे.
चंदनचाेरांचा बंदाेबस्त करण्याची मागणी
बुलडाणा : शहरात चंदन चाेर सक्रिय झाले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमाेर असलेली चंदनाची झाडे लंपास करण्यापर्यंत चोरट्यांची हिंमत वाढली आहे. चाेरट्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी हाेत आहे.
शेतकऱ्यांची लूट थांबवण्याची मागणी
किनगाव राजा : परिसरात कृषी केंद्र संचालकांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. खते, बियाणे वाढीव दराने विकले जात असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. होणारी लूट थांबवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
क्षयराेग, कुष्ठराेग जनजागृती माेहीम
सिंदखेड राजा : येथील ग्रामीण रुग्णालयात १ जुलै राेजी डाॅक्टर दिनानिमित्त क्षयराेग व कुष्ठराेग जनजागृती माेहिमेला सुरुवात करण्यात आली. यावेळी काेराेनाकाळात अविरत सेवा देणाऱ्या डाॅक्टरांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी डाॅ. सुनीता बिराजदार हाेत्या.
‘दुबार पेरणीसाठी माेफत बियाणे द्या’
बुलडाणा : जिल्ह्यातील अनेक भागात गत आठ ते दहा दिवसांपासून पावसाने दांडी मारली असून, अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. दुबार पेरणीसाठी शासनाने माेफत बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
माेताळा तालुक्यात दमदार पावसाची प्रतीक्षा
माेताळा : गत काही दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने माेताळा तालुक्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत. येत्या काही दिवसांत पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके सुकली आहेत.