इतर काही शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करण्यात व्यावसायिकांची तारांबळ उडत आहे. अनेक नागरिकांनी कोरोनाच्या भीतीने बाहेर पडणे बंद केल्याचे दिसून येत आहे. त्याचा परिणाम व्यवसायावर जाणवत आहे. संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी बाजार परिसरात शुकशुकाट दिसून आला. दुसरबीड येथील काही व्यापाऱ्यांशी चर्चा केली असता, व्यावसायावर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. दुसरबीड येथील दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याच्या सूचना सर्वांना देण्यात आल्या आहेत. त्याच प्रमाणे मंगळवारी दुसरबीड येथील बाजार असतो; परंतु बाजार भरणार नाही. मास वापरणे, गर्दी न करणे आदी नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनेकांनी नियम पाळण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र काही लोक याला न जुमानता बाहेर फिरत आहेत.
दुसरबीड येथील आठवडी बाजार राहणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 4:52 AM