मलकापूर पांग्रा येथे वीस वर्षांपासून प्रताप देशमुख यांच्या संकल्पनेतून दूधवाटप करून नववर्ष स्वागत करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. युवकांनी व्यसनापासून मुक्त व्हावे यासाठी हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. नववर्ष स्वागत म्हणून दारू न पिता दूध पिण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन भगवान साळवे, वसीम शेख साजिद खान, डॉ. सुरेश डोडिया, राजेश देशपांडे, फकिरा पठाण आदींसह गावातील तरुणांनी एकत्र येऊन केले. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक प्रताप देशमुख यांचे निधन झाल्याने हा कार्यक्रम करायचा की नाही, अशी साशंकता होती. तरीदेखील त्यांच्या पश्चात त्यांचे बंधू प्रल्हाद देशमुख यांनी हा कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला. अध्यक्षस्थानी वामनराव जाधव, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रभाकर ताठे, डॉ. शिवाजीराव खरात, गुलशेर खासाब, वसंतराव उदावंत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान साळवे तर आभार प्रदर्शन साजिद खान यांनी मानले. यावेळी युवकांना दुधाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उद्धव देशमुख, ज्ञानेश्वर देशमुख, संतोष देशमुख, अंकुश देशमुख, अमोल देशमुख, लुकमान शेख, बद्री काळे, गजानन देशमुख आदींनी परिश्रम घेतले.
मलकापूर पांग्रा येथे दूध पिऊन नववर्षाचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2021 4:28 AM