शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

विहीर खोदली; अनुदान मात्र नाही!

By admin | Published: August 28, 2016 11:19 PM

मेहकर तालुक्यातील प्रकार; शेतकरी अद्याप सिंचन विहिरीसाठी देय अनुदानापासून वंचित.

जानेफळ(जि. बुलडाणा),दि. २८: विविध कामांच्या बाबतीत नेहमीच चर्चेत राहणारी रोजगार हमी योजना सध्या मेहकर तालुक्यातील सिंचन विहिरींमुळे पुन्हा चर्चेत आली असून या योजनेतून विहिर मंजूर झालेल्या शेतकर्‍यांनी ३0 फूट खोल विहिर खोदून पूर्ण केलेली असतांना त्यांना अद्यापपर्यंंंत अनुदान देण्यात आलेले नसल्याचा प्रकार समोर आला आहे. तर दुसरीकडे काही शेतकर्‍यांनी विहिरीच्या कामाला सुरुवारत केलेली नसताना सुद्धा त्यांना मात्र दोन टप्प्याच्या कामाचे धनादेश देऊन पैसे अदा करण्यात आल्याची तक्रार शेषराव श्रीराम धोटे यांनी केली आहे.मेहकर तालुक्यातील उटी येथील शेषराव श्रीराम धोटे यांना यावर्षी रोजगार हमी योजनेतून सिंचन विहिर मंजूर झालेली आहे. त्यांना या विहिरीच्या कामाचे वर्क ऑर्डर २२ एप्रिल २0१६ रोजी मिळाल्यानंतर त्यांनी गट नं.४७ मधील आपल्या शेतात विहिरीच्या कामाला सुरुवात करुन ३0 फुट खोल विहिर खोदल्याने त्या विहिरीला चांगल्या प्रमाणात पाणी सुद्धा लागलेले आहे. परंतु त्यांना अद्यापपर्यंंंत एक रुपया अनुदान सुद्धा मिळाले नसल्याने विहिरीचे काम अर्धवट अवस्थेत पडून आहे. त्यांना उसणवारीने तसेच पतसंस्थेचे कर्ज काढून विहरीसाठी पैसा लावलेला असताना त्यांची अडवणूक करुन पैसा देण्यास टाळाटाळ केल्या जात आहे. तर दुसरीकडे मात्र गोपाल भास्कर धोटे रा.उटी ता. मेहकर यांना सुद्धा रोजगार हमी योजनेतून विहिर मंजूर झालेली असताना त्यांना २0 मे २0१६ ला वर्क ऑर्डर मिळून सुद्धा त्यांनी कामाला कुठलीच सुरवात केलेली नाही; त्यांना मात्र दोन टप्प्यात वेगवेगळ्या तारखेला दोन चेकद्वारे विहिरीच्या कामाचे पैसे अदा करण्यात आले आहेत, अशी तक्रार शेषराव धोटे यांनी जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. यावरुन मेहकर पंचायत समिती अंतर्गत झालेल्या रोजगार हमी योजनेच्या सिंचन विहिरी तसेच इतर कामांमध्ये मोठे गौडबंगाल झाल्याचे दिसून येत आहे.