शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
6
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
7
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
8
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
9
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
10
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
11
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
13
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
14
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
15
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
16
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
17
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
18
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
19
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
20
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात

माझ्या शाळेच्या गणवेशाचा रंग कोणता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 11:48 AM

Education Sector News : माझ्या शाळेच्या गणवेशाचा रंग कोणता? असा प्रश्नच विद्यार्थ्यांमधून उपस्थित होत आहे. 

- ब्रह्मानंद जाधवलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: समग्र शिक्षा अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात येतो, परंतू नेहमीप्रमाणेच यंदाही शिक्षण विभागाच्या तिजोरीत गणवेशाच्या निधीसाठी खणखणाटच आहे. मुलांना वेळेवर गणवेश मिळत नाही, त्यात आता ऑनलाइन शिक्षण त्यामुळे माझ्या शाळेच्या गणवेशाचा रंग कोणता? असा प्रश्नच विद्यार्थ्यांमधून उपस्थित होत आहे. दरवर्षी विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव हा जुन्याच गणवेशावर होतो. त्यामुळे किमान अर्धे शैक्षणिक सत्र होईपर्यंत तरी, विद्यार्थ्यांना नव्या गणवेशाची वाट बघावी लागते. यंदाही शिक्षण विभागाची काही परिस्थिती वेगळी नाही. कोरोना विषाणू संसर्गामुळे मागील वर्षीप्रमाणेच यंदाही ऑनलाइनच शाळा राहणार आहे. जिल्ह्यात २८ जूनपासून नविन शैक्षणिक सत्रातील शाळा सुरू होणार आहेत. परंतू शाळेकडून विद्यार्थ्यांना मोफत दिल्या जाणाऱ्या गणवेशाची प्रतीक्षाच करावी लागणार आहे. समग्र शिक्षा अभियानाकडे गणवेशासाठी निधीच नाही. 

कोणाला दिला जातो मोफत गणवेश? जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व मुलींना समग्र शिक्षा अभियान अंतर्गत दोन मोफत गणवेश दिले जातात. त्यानंतर इयत्ता पहिली ते आठवीतील अनुसूचित जाती जमातीतील मुलांनाही मोफत गणवेश दिला जातो.

पहिली, दुसरीतील विद्यार्थ्यांना गणवेशच माहित नाही कोरोना विषाणू संसर्गामुळे मागील वर्षीपासून ऑनलाइन शिक्षणच सुरू आहे. ऑनलाइन वर्गात कोणता गणवेश घातला याला महत्त्वच राहिलेले नाही. त्यामुळे मागील वर्षी आणि यावर्षीच्या पहिली, दुसरीतील विद्यार्थ्यांना आपल्या शाळेचा गणवेश कोणता आहे, हेच माहित नसल्याचे चित्र आहे.

समग्र शिक्षा अभियानाकडे सध्या गणवेशासाठी निधी उपलब्ध नाही. निधी प्राप्त होताच, शाळा स्तरावर थेट वितरण करण्यात येईल. -सचिन जगताप, प्राथमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSchoolशाळाStudentविद्यार्थी