वेळ कमी असल्याने लागतात रांगा : काेराेना संसर्ग वाढण्याची भिती बुलडाणा : जिल्ह्यात काेराेना संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने विविध निर्बंध लावण्यात आले आहेत़ बॅंकाची वेळही कमी करण्यात आल्याने शहरासह ग्रामीण भागात नागिरकांच्या रांगा लागत असल्याचे चित्र आहे़ स्टेट बॅंक आफ इंडियाच्या बुलडाणा आणि डाेणगाव शाखेत साेमवारी माेठ्या प्रमाणात गर्दी झाली हाेती़ त्यामुळे काेराेना संसर्ग वाढण्याची भिती व्यक्त हाेत आहे़
गत काही दिवसांपासून राज्यभरात काेरेाना संसर्ग वाढत आहे़ वाढत्या काेराेना संसर्गाला राेखण्यासाठी राज्य शासनाने विविध उपाय याेजना सुरू केल्या आहेत़ यामध्ये १५ एप्रिलपासून जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे़ तसेच बॅंकाची वेळही कमी करण्यात आली आहे़ बॅंकाचे कामकाज सकाळी ११ ते २ पर्यंतच असल्याने शहरासह ग्रामीण भागात नागरिकांची माेठी गर्दी हाेत आहे़ अनेक बॅंकासमाेर रांगा लागत असल्याने काेराेना संसर्ग पसरण्याची भिती व्यक्त हाेत आहे़ बॅंकाकडून विविध उपाय याेजना करण्यात येत असल्या तरी माेठ्या प्रमाणात हाेत असलेली गर्दी राेखण्यात त्यांना अपयश येत आहे़ त्यामुळे, शासनाने बॅंकाच्या वेळा वाढवण्याची गरज आहे़
स्टेट बॅंक, शाखा बुलडाणा
बुलडाणा शहरातील स्टेट बॅंक आॅफ इंडियाच्या मुख्य शाखेत शहरासह ग्रामीण भागातील नागरिकही येतात़ त्यामुळे, शाखेत दरराेज गर्दी हाेते़ विविध कामासाठी आलेल्या नागिरकांच्या रांगा लागतात़ लाेकांना काेराेनाविषयक नियमांचे पालन करायला लावण्यासाठी चाैकीदाराची नियुक्ती करण्यात आलेली आहे़ मात्र, तरीही अनेक जण फिजिकल डिस्टन्सींगचे पालन करीत नाहीत़
स्टेट बॅंक शाखा डाेणगाव
महामार्गावरील डाेणगाव येथील स्टेट बॅंकेच्या शाखेत परिसरातील ग्रामस्थ आर्थिक व्यवहार करण्यासाठी येतात़ बॅंकेत एकच कॅश काउंटर असल्याने माेठ्या प्रमाणात रांगा लागतात़ यावेळी फिजिकल डिस्टन्सींगचा फज्जा उडत असल्याने काेराेना संसर्ग पसरण्याची भिती आहे़ बॅंकेकडून विविध उपाय याेजना केल्या असल्या तरीही गर्दी माेठ्या प्रमाणात हाेत असल्याने नियमांचे पालन करण्यात अडचणी येतात़
बॅकेत एकच कांउटर असल्याने बॅकेत गर्दीमध्ये उभे रहावे लागते. त्यामुळे बँकेने कॅश कांउटर वाढविल्यास गर्दी होणार नाही व रांगेत उभे रहावे लागणार नाही. अबरार खान, डोणगांव
विदर्भ क्षेत्रीय कोकण ग्रामीण बॅंकेने ग्राहकांना उन्हात बाहेर उभे न करता बॅकेमार्फेत त्यांना उभे राहण्यासाठी समोर मंडप टाकावा. तसेच फिजिकल डिस्टन्सींगचे ग्राहकांना पालन करण्यास सांगावे व कॅश काऊंटर वाढवावे.
विजय खरात, डोणगांव
बॅंकाची वेळ कमी झाल्याने गर्दी वाढत आहे. एकाच वेळी सर्वांना आर्थिक व्यवहार करायचे असल्याने बॅंकाच्या शाखांमध्ये गर्दी वाढत आहे. त्यामुळे, बॅंकाची वेळ वाढवण्याची गरज आहे
अमाेल वानखडे, ग्राहक, बुलडाणा
सध्या ग्राहकांच्या हितासाठी कोरोना काळात बॅकेत फक्त नगदी रोकड काढणे व इतरत्र पाठविणे हे आवश्यक व्यवहार बॅकेमार्फत सुरू आहेत़ नागरीकांनी इतर कामासाठी बॅकेत येऊ नये व गर्दी करू नये़ तसेच कोविड च्या नियमांचे पालन करावे. अमोल नाफडे, शाखाधिकारी स्टेट बँक ऑफ इंडिया डोणगांव