कारण काय?
-मोबाईलची बॅटरी बदलण्यासाठी
- चार्जिंग सॉकेट खराब झाले
- चार्जर खराब झाला
- स्क्रीनगार्ड बदलण्यासाठी
- नवा मोबाईल घेण्यासाठी
- मोबाईल हँग होत असल्यामुळे
- मोबाईल कव्हर घेण्यासाठी
५५ दिवसांपासून दुकाने बंद
कोरोना प्रतिबंधासाठी लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे जवळपास ५५ दिवस मोबाईलचीही दुकाने बंद होती. आता त्यात काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे मोबाईल दुरुस्ती, नवा मोबाईल घेण्यासाठी ग्राहक दुकानात येत आहेत. सुरक्षित अंतर राखण्यासोबतच नियमांचे पालन करण्याच्या सूचना आम्ही सातत्याने देत असतो. बऱ्याचदा ग्राहकांकडून त्याकडे दुर्लक्ष होते. कोरोनाचा फटका आमच्या व्यवसायालाही बसत आहे.
मयूर, मोबाईल व्यावसायिक
दीड महिन्यापासून व्यवसाय ठप्प
कठोर निर्बंधांमुळे गेल्या दीड महिन्यापासून व्यवसाय ठप्प झाला आहे. दुकानेही बंद होती. आता काही प्रमाणात शिथिलता मिळाल्यामुळे थोड्याफार प्रमाणात व्यवसाय होत आहे. सर्व सुरळीत होण्यास अद्यापही बराच विलंब लागेल, असे एका मोबाईल दुकानदाराने सांगितले.
----
नव्यानेच नामांकित कंपनीत नोकरी लागली आहे. अद्याप कंपनीकडून लॅपटॉप मिळाला नाही. त्यामुळे मोबाईलवरूनच ऑनलाईन काम करत आहे. तो खराब झाल्यामुळे मोबाईल दुरुस्ती आवश्यक असल्याने मी आले आहे.
(कल्याणी मुळे)
----
माझ्या भाच्याचे १४ जूनपासून ऑनलाईन एज्युकेशन सुरू होत आहे. त्यासाठी मोबाईल आवश्यक आहे. तो हँग होत असल्याने दुरुस्तीसाठी दुकानात आलो होताे. सुरक्षेची काळजी आम्ही घेत आहोत.
(संजय पानट)