शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

अंढेरा येथील शाळेच्या विकासासाठी व्हॉट्स ग्रुपचा पुढकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 4:25 PM

अंढेरा : व्हॉट्स ग्रुपव्दारे एकत्र आलेल्या तरूणांनी विद्यार्थी विकास बचत गटाची स्थापना करून आर्थिक व श्रमदान करून अवघ्या तिन दिवसात गावातील जिल्हा परिषद  शाळेच्या विकासासाठी पुढाकार घेतला आहे.

ठळक मुद्दे व्हॉट्स ग्रुपच्या सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची एक खोली दुरुस्ती करुन डिजिटल केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पिंप्री खंदारे गावातील तरुणांनी एक ग्रृप तयार केला. अनेक पदांवर काम करणारे हे तरुण आपल्या कुवतीनुसार दरमहा गावाच्या विकासासाठी पैसा पाठवतात.

अंढेरा : व्हॉट्स ग्रुपव्दारे एकत्र आलेल्या तरूणांनी विद्यार्थी विकास बचत गटाची स्थापना करून आर्थिक व श्रमदान करून अवघ्या तिन दिवसात गावातील जिल्हा परिषद  शाळेच्या विकासासाठी पुढाकार घेतला आहे. यावेळी व्हॉट्स ग्रुपच्या सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची एक खोली दुरुस्ती करुन डिजिटल केली आहे. एकदा बाहेर पडलेली पावलं परत शाळेकडे कशी वळतील ही चिंता सगळ्याच शाळांना असते. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून पिंप्री खंदारे गावातील तरुणांनी एक ग्रृप तयार केला. त्यामध्ये गावातून  नोकरीधंद्यासाठी बाहेरगावी स्थायिक असलेल्यांशी संपर्क करून त्यांनाही या  ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. राजु केंद्रे यांनी गावातील अशा तरुणांशी संपर्क करून  व्हॉट्स अ‍ॅपवर हा ग्रुप विद्यार्थी विकास बचत गट नावाने निर्माण केला. यात सुमारे ६० सदस्य एकत्र आले. त्यानंतर आपल्या हातून चांगले उपक्रम पार पाडायचे यासाठी या तरूणांनी प्रत्यक्षात अंमलबजावणीला सुरूवात केली. ३० युवकांनी विद्यार्थी विकास निधी म्हणून ३० हजार रुपये जमा केले असुन, यातून सुरूवातीला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या एका वर्गखोलीला दुरूस्त करुन, बोलक्या भिंतीचा उपक्रम राबविण्यात आला. त्यानंतर एकलव्य गृपच्या माध्यमातून शाळेला प्रोजेक्टर मिळाल्याने शाळा डिजिटल सुद्धा झाली आहे. विद्यार्थी विकास बचत गटाचे अध्यक्ष शिवहरी ढाकणे, सचिव बबन गवई, ग्राम-विकास दुत राजु केंद्रे, गजानन वाघ, भूषण पवार, भास्कर पवार, भास्कर ऊबाळे, बंडु ऊबाळे, अतिश गवई, शिवहरी ढाकणे, परमेश्वर उगलमुगले, पांडुरंग गिरके, देविदास सोनुने, शिक्षक तागवले, शिक्षक सोनुने, विष्णू विटकर, पांडुरंग कांबळे, पेंटर धुमाळ, बाळु इंगळे यांनी तिन दिवस शाळेतील वर्गखोलीसाठी श्रमदान केले. अनेक पदांवर काम करणारे हे तरुण आपल्या कुवतीनुसार दरमहा गावाच्या विकासासाठी पैसा पाठवतात. त्यातून गावातील प्राथमिक शाळेची दुरुस्ती करण्यात आली आहे.  तसेच शाळेची रंगरंगोटी करण्यात आली आहे. या तरूणांच्या या पुढकारामुळे शाळेचा कायापालट दिसून येत आहे. 

ग्रंथालयांसाठी पाच हजार पुस्तकेमहाराष्ट्रात गाव तिथे ग्रंथालय संकल्पनेवर काम करणाºया एकलव्य गृपवर समन्वयक राजु केंद्रे यांच्या माध्यमातून  व ई-लर्निंगसाठी प्रोजेक्टरची मदत झाली आहे. एकलव्याच्या माध्यमातून आतापर्यंत पाच जिल्ह्यात २५ गावात वाचनालये उभे राहण्यासाठी ५००० पुस्तके देण्यात आली आहेत, व ५ शाळा डिजिटल करण्यासाठी प्रोजेक्टर व इ-लर्निंग साहित्याची मदत करण्यात आली आहे .

टॅग्स :buldhanaबुलडाणा