लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा: तालुक्यातील साखरखेर्डा येथील पैनगंगा सहकारी सुत गिरणीची चाके गेल्या दहा वर्षापासून बंद पडली आहेत. त्या गिरणीला पुर्वीचे वैभव प्राप्त करण्यासाठी चायना कंपनीच्या माध्यमातून डॉ. विशाल बाहेकर यांनी पुढाकार घेतला असून येत्या नोव्हेंबर पर्यंत गिरणी सूरू होणार आहे. दरम्यान, चायनाच्या उद्योगपतींनी नुकतीच सुत गिरणीची पाहणी केली.पैनगंगा सहकारी सूत गिरणीची पाहणी करण्यासाठी चायनाचे उद्योगपती आणि त्यांच्या सोबत काम करणारे डॉ. विशाल बाहेकर हे साखरखेर्डा येथे आले असता, त्यांनी परीसराची पाहणी करून गिरणीला पुर्व वैभव प्राप्त कसे होईल, याबाबत चर्चा केली. लगेचच गिरणीला काय यंत्र सामुग्री लागेल याचे बजेट तयार करून ६ एप्रील पासून कामाला सुरूवात देखील करण्यात आली आहे. यावेळी बुलडाणा अर्बनचे कार्यकारी संचालक सुकेश झंवर यांच्या हस्ते सहकार महर्षी कै. भास्करराव शिंगणे यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून कामाला सुरूवात करण्यात आली. यावेळी बुलडाणा अर्बन परीवाराकडून मदत देण्याची ग्वाही बुलडाणा अर्बनचे कार्यकारी संचालक सुकेश झंवर यांनी दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. प्रकाश गवई हे होते. तर प्रमूख अतिथी म्हणून दिनकरराव देशमूख, राम जाधव, सभापती राजू ठोके, गणेश बाहेकर, सविता बाहेकर, प्रकाश बाहेकर, नंदकिशोर बाहेकर, अरविंद पºहाड, तेजराव देशमूख, दाऊद कुरेशी, साबीर खा पठाण, विनायक गायकी, संतोषराव मोरे, आदी उपस्थीत होते. संचालन अजीम नवाज राही यांनी केले. तर अभार सुत गिरणीचे कार्यकारी संचालक बबन लोढे यांनी मानले.
नोव्हेंबरमध्ये सूत बाहेर निघेलसूत गिरणीची ६० एकर जमीन असून गिरणी सूरू होताच शेतकऱ्यांचा कापूस सुध्दा खरेदी करण्यात येणार आहे. त्याच बरोबर ठिंबक सिंचन वेस्टेज पाईप खरेदी करून ५० टक्के सवलतीच्या दरात नविन पाईप शेतकऱ्यांना देणार असल्याचे यावेळी डॉ. विशाल बाहेकर यांनी सांगीतले. गिरणीसाठी आवश्यक ती यंत्र सामूग्री येत्या महीन्यातच पोहचून आक्टोंबर पर्यंत गिरणी उभी राहील. नोव्हेंबरला सूत बाहेर निघेल, असे बाहेकर यांनी सांगितले.
सुत गिरणी सुरू व्हावी आणि या भागातील कामगारांना रोजगार मिळावा, यासाठी प्रयत्न केले आहेत. परंतू एकही व्यापारी थांबत नव्हता. चायनाचे उद्योगपती यांच्या सोबत काम करणारे डॉ. विशाल बाहेकर यांनी हा परीसर पाहिल्यानंतर निश्चीतच व्यवसायात वृध्दी होईल, याची खात्री पटल्याने त्यांनी गिरणी सूरू करण्याचा निर्णय घेतला.- बबनराव लोढे,कार्यकारी संचालक,पैनगंगा सुत गिरणी, साखरखेर्डा.