--केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशाची प्रतीक्षा--
मध्य रेल्वे अंतर्गत नागपूर ते भुसावळ दरम्यान सहा पॅसेंजर गाड्या धावत होत्या. या पॅसेंजर गाड्या पूर्ववत सुरू करण्याची मागणी आहे. ३६ सदस्य असलेल्या डीआरईसीच्या मध्यंतरी झालेल्या बैठकीतही हा मुद्दा मध्यंतरी समिती सदस्य ॲड. महेंद्रकुमार बुरड यांनी उपस्थित केला होता. मात्र केंद्रीय गृहमंत्रालय व त्यानंतर रेल्वे बोर्ड जोपर्यंत परवानगी देत नाही तोपर्यंत याबाबत रेल्वे प्रशासनास निर्णय घेता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
--प्रवासी संघटना काय म्हणते--
कोविडच्या नावाखाली रेल्वे प्रशासन सर्व गाड्या नियमित चालवित असून स्वत:चा फायदा होणाऱ्या गाड्या स्पेशलच्या नावाखाली सुरू आहेत. त्यातील अनारक्षित डब्बे रद्द करून ते आरक्षित केले आहेत. विना आरक्षित तिकीट देणे बंद आहे. त्यामुळे सर्व लहान-मोठ्या स्थानकांवर थांबणाऱ्या रेल्वे पॅसेंजर बंद आहेत. परिणामी व्यावसायिक, शासकीय तथा अन्य कामासाठी जाणाऱ्यांना मोठा त्रास होत आहे. त्यादृष्टीने रेल्वे प्रशासनाने आता भूमिका घेण्याची गरज आहे.
(ॲड. महेंद्रकुमार बुरड, जिल्हा प्रवासी (सेवा) संघ, अध्यक्ष, मलकापूर)
--सध्या सुरू असलेल्या रेल्वे--
हावडा-अहमदाबाद एक्सप्रेस
नवजीन एक्सप्रेस
महाराष्ट्र एक्सप्रेस
आझाद हिंद
गीतांजली
बिकानेर-सिकंदराबाद
द्वारका एक्स्प्रेस
गांधीधाम-पुरी
हमसफर एक्स्प्रेस
मुंबई-हावडा
अेाखा-पुरी
आमदाबाद-पुरी
--या गाड्या कधी सुरू होणार
मध्य रेल्वे अंतर्गत सहा पॅसेंजर नागपूर ते भुसावळ अशा धावतात. वर्धा-भुसावळ, नागपूर-भुसावळ, नरखेड-भुसावळ अशी त्यांची नावे आहेत. डाऊन आणि अप मिळून एकूण या सहा पॅसेंजर धावतात.