दुसरीकडे निवडणूक विभागासमोरही खर्चाचा ताळमेळ बसविणे अवघड बनत आहे. त्यामुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांचे मानधन वेळेत मिळावे, अशी मागणी होत आहे.
--तोकडा निधी प्राप्त--
आर्थिक वर्ष संपताना निवडणूक विभागाच्या ग्रामपंचायत विभागाला १ कोटी ५० हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. मात्र, तोही तोकडा आहे. त्यातून ग्रामपंचायत स्तरावर झालेला सुमारे २९ हजार २०० रुपयांचा खर्च कसाबसा निघत आहे. मात्र, अन्य खर्च अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे हा निधी कधी उपलब्ध होईल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
--निधीची अडचण--
कोरोना संसर्गामुळे वेळेत निधी उपलब्ध होण्यात अडचण आहे. यापूर्वीही झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी ताेकडा निधी प्राप्त झाला होता. आता आर्थिक वर्ष संपत असताना किमानपक्षी शेवटच्या टप्प्यात निधी उपलब्ध होईल, अशी आस आहे.
:- ५२७ ग्रामपंचायतींच्या जिल्ह्यात झाल्या निवडणुका
:- १९५० अधिकाऱ्यांनी बजावले कर्तव्य
:- ९५०० कर्मचाऱ्यांनी बजावले कर्तव्य
:- ४ कोटी रुपये निवडणुकीवर झाला प्रशासकीय खर्च
:- १ कोटी २६ लाख रुपयांचा निधी आतापर्यंत प्राप्त