लोकमत न्यूज नेटवर्कधाड : धाडचे बसस्थानक अनेक समस्यांनी ग्रासले असून, या समस्या कधी सुटणार असा प्रश्न प्रवासी उपस्थित करीत आहेत. बुलडाणा विभागात असणाºया बसस्थानकापैकी बुलडाणा औरगांबाद मार्गावर धाड े बसस्थानक आहे. एस.टी.महामंडळाने साधारण २० ते २५ वर्षापूर्वी धामणगांव रोडलगत प्रशस्त जागा घेवून, तात्पुरते एस.टी.रोड उभारुन बसस्थानक सुरु केले. ह्या ठिकाणी वाहतूक नियंत्रक आणि प्रवासी निवारा असा एकत्रीत बांधकाम वजा शेड म्हणजे बसस्थानक आहे. त्यावेळी बाजुला अपुºया जागेवर महिला आणि पुरुषांकरता स्वच्छता गृह तयार केले. याठिकाणी शौचालय बांधकाम करण्यात आले नाही. तेव्हापासून तर आतापर्यंत एस. टी. महामंडळाने बसस्थानकात प्रवाशांना आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या नाही. या बसस्थानकावरुन दैनंदिन व प्रासंगीक स्वरुपात प्रवास करणाºया प्रवाशांची संख्या भरपूर आहे. प्रामुख्याने नोकरदार महिला शाळा, महाविद्यालय व खाजगी शिकवणी निमित्त असंख्य महिला व मुली धाड बसस्थानकावर येतात परंतु शौचालय, पुरेसा निवारा, पाणी आवश्यक सुरक्षा व्यवस्था, लाईट व्यवस्था ह्या मुलभूत सुविधांची वाणवा आहे.
धाडच्या एस.टी.बसस्थानकाच्या समस्यांचे ग्रहण सुटणार कधी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 8:18 PM
धाड : धाडचे बसस्थानक अनेक समस्यांनी ग्रासले असून, या समस्या कधी सुटणार असा प्रश्न प्रवासी उपस्थित करीत आहेत.
ठळक मुद्देअनेक समस्यांनी ग्रासलेसमस्या कधी सुटणार असा प्रश्न