कोरोना लसीकरण टाळण्यासाठी दिली जाताहेत कारणे...
लस घेण्यासंदर्भात सध्या गावागावात शिबिर घेण्यात येत आहे; मात्र सध्या तब्येत ठीक नाही, नंतर लस घेते, मागील महिन्यातच कोरोना झाला होता, असे म्हणत अनेक महिला लस घेण्याला सोयीस्कररीत्या बगल देत असल्याचे समोर येत आहे. अन्य जिल्ह्यात काही जणांना कोरोना लसीकरणानंतर ताप, अंगदुखी, डोकेदुखी अशी सौम्य लक्षणे आढळून आली. त्यामुळे अजूनही काही महिलांच्या मनात कोरोना लसीकरणाविषयी धाकधूक असल्याचे दिसून येते.
जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण
महिला १७३६६४
पुरुष १९७४४९
कुठल्या वयोगटात किती?
१८ ते ४४ : ५५२११
४५ ते ५९ : १५७९५१
६० पेक्षा अधिक : १५७७५९
मी लस नाही घेतली कारण....
मी पहिला डोस घेतला. आता दुसरा डोस घेणे आवश्यक आहे. लस घेण्यासाठी वारंवार केंद्रावर चकरा मारल्या; परंतु लस उपलब्ध नसल्याचे सांगितल्या जाते. त्यामुळे लस घेण्याचे राहून गेले. लस मिळाली तर नक्की घेऊ.
कमल पवार,
इतर आजाराच्या गोळ्या सुरू आहेत. त्यामुळे लस घेतली नाही. लस घेतल्यानंतर काही आजार होणार नाही ना, याचीही मनात भीती होती; परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याने गावात लस घेण्यात येईल.
अलका इंगळे.
लसीकरण केंद्रावर असलेली गर्दी पाहूनच आम्ही घरी आलो. लसीकरणासाठी मुलांनी नोंदणी केलेली आहे; परंतु गर्दीत जाण्यासाठी कोरोनाची भीती वाटते.
नेहा मुळे.