बुलडाणा शहरात अकरावी प्रवेशासाठी एकूण आठ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. यामध्ये १ हजार ७०० विद्यार्थी क्षमता असून दरवर्षी १०० टक्के प्रवेश या महाविद्यालयात होत आले आहेत. गतवर्षी केवळ १० टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या. यावर्षी अद्याप अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली नसली तरी विद्यार्थी प्रवेशासाठी तयारी करीत आहेत.
अकरावीसाठी गावात प्रवेश का?
अनेक विद्यार्थी ग्रामीण भागात प्रवेश घेण्यासाठी उत्सुक असण्यापाठीपागच्या कारणांचा शोध घेतला असता वर्षात ४ ते ५ वेळा महाविद्यालयात गेले आले. नंतर नाही गेले तरी चालते म्हणून मुलांचा ग्रामीण भागात ओढा असल्याचे शिक्षण तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
म्हणून घेतला गावांत प्रवेश
शहराच्या ठिकाणच्या कॉलेजमध्ये घेतली जाणारी फी व ग्रामीण भागातील फीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे. यामुळे ग्रामीण भागातील महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे ठरविले.
प्रतीक देशमुख, विद्यार्थी.
अद्याप प्रवेश प्रक्रिया सुरू झाली नाही. ग्रामीण भागात शिक्षणाची चांगली व्यवस्था झाली असून सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना फी परवडणारी असल्याने ग्रामीण भागात प्रवेश घ्यायचा आहे.
अर्जुन इंगळे, विद्यार्थी.
ऑफलाईन प्रवेश व्हावेत...
दहावी उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश घेणे अडचणीचे ठरते. त्यामुळे ऑफलाईन प्रवेशच योग्य आहेत. या दृष्टीने शासनाने त्वरित पावले उचलावी.
- संतोष आंबेकर.
शहरामध्ये ऑफलाईन पद्धतीनेच दरवर्षी प्रवेश घेतले जातात. प्रवेश घेताना पालकांना अडचणी येऊ नयेत
याकरिता ऑफलाईन प्रवेशच योग्य आहे.
- डी. एस. लहाने.
शहरात अकरावीला प्रवेश देणारी कनिष्ठ महाविद्यालये - ८
एकूण जागा - १७००
गेल्या वर्षी किती अर्ज आले - १४२०
किती जणांनी प्रवेश घेतला - १४२०
किती जागा रिक्त राहिल्या - ००