बुलढाणा : अजिंठा पर्वत रांगेत असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेला प्राणी गणना करण्यात आली. यामध्ये ८ बिबटे, १७ हरणांसह इतर प्राण्यांची नोंद करण्यात आली. या वन्य प्राण्यांनी अभयारण्याच्या वैभवात भरच घातली आहे.
ज्ञानगंगा अभयारण्यात दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात वन्यप्राण्यांची गणना केली जाते. यावर्षी ५ मे राेजी जवळपास ४० ते ४५ मचाणावरून प्राणी गणना करण्यात आली. गत काही दिवसांपासून अवकाळी पाऊस हाेत असल्याने पर्यटकांसाठी यंदा १० मचाण ठेवण्यात आले हाेते. त्याची ऑनलाइन नाेंदणी करण्यात आली. १० पर्यटकांबराेबर १० वनमजूर आणि इतर ३० ते ३५ मचाणावरून ज्ञानगंगा अभयारण्यात प्राणी गणना करण्यात आली.
बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य जैवविविधतेने समृद्ध आहे. या अभयारण्यात अस्वलांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात असल्याने हे अभयारण्य अस्वलांची भूमी म्हणून ओळखले जाते. अस्वलाव्यतिरिक्त बिबट्या, लांडगा, कोल्हा, सायळ, हरीण, चिंकारा, भेळकी, नीलगाय, रानडुक्कर, मोर, अजगर, खवल्या मांजरसह विविध प्रजातीचे पक्षी व सरपटणाऱ्या जीवांचा अधिवास आहे. मध्यंतरी सी-वन पट्टेदार वाघ व रानगव्याचे आगमन या अभयारण्यात झाले होते. दाेन ते तीन वर्षे काेराेनामुळे वन्य प्राण्यांची गणना रद्द करण्यात आली हाेती. यंदा वातावरणातील बदलामुळे पर्यटकांसाठी केवळ १० मचाणच ठेवण्यात आले हाेते.
असे आढळले प्राणी -बिबट ०८अस्वल १९रानडुक्कर २०५सायाळ ०५ससा ०४तडस ०२भेडकी ०९निलगाय १६०माेर/ लांडाेर १०१चिंकारा ०३हरणी १७रानमांजर ०१