- संदीप वानखडे लोकमत न्यूज नेटवर्कगुजरात, मध्यप्रदेशातील खासगी बसेस बुलडाणा जिल्ह्यात धावत आहेत. परवानगी नसताना तसेच कुठलीही आरोग्य तपासणी न करता प्रवाशांना बसमध्ये प्रवेश देण्यात येत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भिती व्यक्त होत आहे. या बसेसवर कारवाईविषयी बुलडाणा येथील सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांच्याशी साधलेला संवाद...
गुजरात, मध्यप्रदेशातील खासगी बसच्या माध्यमातून वाहतुक सुरु आहे, याविषयी आपली भूमीका काय आहे?परराज्यातून धावणाºया खासगी बसेसवर कारवाईची मोहिम सुरू केली आहे. ही मोहिम आणखी तीव्र करण्यात येणार आहे. या बसेसची कागदपत्रे, प्रवाशांचे इ-पास आणि फिजिकल डिस्टन्स आहे किंवा नाही या मुद्यांवर कारवाई करण्यात येत आहे.
आतापर्यंत किती खासगी बसवर कारवाई करण्यात आली? आतापर्यंत जिल्ह्यात विनापरवानगी धावणाºया १४ खासगी बसेसवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये परराज्यासह इतर जिल्ह्यातील बसेसचा समावेश आहे. दोन खासगी बस मालकांवर दंडात्मक कारवई केली आहे. या बसेसवर कारवाईची मोहिम यापुढेही सुरूच राहणार आहे.
या बसेसना आळा घालण्यासाठी काय उपाययोजना केली? खासगी बस जप्त करण्याची मोहिम सुरू करण्यात आली आहे. पुन्हा त्याच बस प्रवाशी वाहतुक करताना आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये दंड वाढविण्यात येईल. तसेच वेळ पडल्यास अशा बसेसचे परवाने निलंबीत करण्याची कारवाई करण्यात येईल. नियमांचे पालन न केल्यास खासगी बस मालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसात ही मोहिम आणखी तीव्र करण्यात येईल.
नंबर नसलेल्या वाहनांवर काय कारवाई होणार ?जिल्ह्यात अनेक वाहनावर नंबर टाकलेला नसतो. अशी वाहने रेतीची अवैध वाहतुक करण्यासाठी वापरण्यात येतात. या वाहनांवरही १ जुलैपासून कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच रिफ्लेक्टर न लावलेल्या वाहन चालकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. विना क्रमांक आणि रिफ्लेक्टर नसलेली वाहने आढळल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. महसूल वाढविण्याच्या दृष्टीने कार्यालयात नियमांचे पालन करून कामकाज सुरू करण्यात आले आहे.
विनापरवानगी धावणाºया १४ खासगी बसेसवर कारवाई करण्यात आली आहे. कारवाई करण्यात आलेली ही वाहने पुन्हा प्रवासी वाहतूक करताना आढळून आल्यास त्यांना केलेल्या दंडात अधिक वाढ करून कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने सतर्क आहोत. परराज्यातून येणाºया खासगी बसेसवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. या बस जप्त करण्याची मोहिम सुरू आहे - जयश्री दुतोंडे