- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: सोयाबीनचे बियाणे निकृष्ट निघाल्याचा मुद्दा गंभीरतेने घेतला असून प्रकरणी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा दर्जेदार बियाणे किंवा आर्थिक स्वरुपात मदत देण्यात येईल. यासंदर्भात संबंधित बियाणे कंपन्यांशी चर्चा झाली असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली. दरम्यान, यासंदर्भात जिल्ह्यातील एकंदर स्थितीचा आपण सविस्तर अहवाल मागितला असल्याचे पालकमंत्र्यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.बुलडाणा जिल्ह्यात जून महिन्याच्या प्रारंभीच जिल्ह्यात पाऊस पडला. त्यामुळे १०० मिमी पेक्षाही कमी पाऊस असतानही शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. मात्र बहुतांश सोयाबीनचे पेरलेले बियाणे उगवले नाही. त्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडे ४४३ शेतकºयांनी तक्रारी केल्यानंतर जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयाच्या अधिकाºयांनी थेट बांधावर जावून पाहणी करण्यास प्रारंभ केला आहे. पालकमंत्र्यांनी याबाबत कृषी विभागाला सुचनाही दिल्या आहेत. या मुद्द्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांच्याशीही या मुद्दयावर सविस्तर चर्चा केली असून यासंदर्भातील सविस्तर अहवालही त्यांना मागितला आहे. जिल्ह्यात ५५७ हेक्टरवरील सोयाबीनचेबियाणे उगवले नसल्याचे स्पष्ट आहे.प्रकरणी बियाणे बनविणाºया संबंधित कंपन्यांशीही या मुद्द्यावर चर्चा झाली असून बहुतांश कंपन्यांनी शेतकºयांना दर्जेदार बियाणे देण्याबाबत किंवा प्रसंगी आर्थिक स्वरुपात मदत देण्याबाबत आश्वस्त केले असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
जिल्ह्यात २ लाख ६३ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणीबुलडाणा जिल्ह्यात दोन लाख ६३ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी आतापर्यंत झालेली असून जिल्ह्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र हे चार लाख नऊ हजार २११ हेक्टर आहे. जिल्ह्यातील पेरणी योग्य असलेल्या सात लाख ३४ हजार १७७ हेक्टरपैकी ५६ टक्के क्षेत्रावर केवळ सोयाबीनची पेरणी होत असते. त्यामुळे बोगस सोयाबीन बियाण्यांचा प्रश्न बुलडाणा जिल्ह्याच्या दृष्टीने गंभीर असल्याचे निदर्शनास येत आहे.
गतवर्षीही सोयाबीनलाच बसला होता फटकागेल्या वर्षी जिल्ह्यात परतीचा पाऊस वार्षिक सरासरीच्या २२.१९ टक्के पडला होता. त्यामुळे शेतकºयाच्या हातातोंडाशी आलेले सोयाबीनचे पीक खराब झाले होते. तर मेहकर आणि लोणार तालुक्यात पैनगंगेसह अन्य नद्यांना आलेल्या पुराचे पाणी थेट शेतात घुसून शेतकºयांच्या सोंगून ठेवलेल्या सुड्याही पाण्यात वाहून गेल्याने पाच कोटीं रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले होते.मध्यप्रदेशातील कंपनीला नोटीससोयाबीन बियाणे उगवल्या नसल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी पाहता बहुतांश कंपन्यांनी दुसरे बियाणे देण्याबाबत प्रशासनाला आश्वस्त केले असले तरी मध्य प्रदेशातील रवि सिड्स या कंपनीने यासाठी नकार दिला असल्याचे पालकमं६ी म्हणाले. त्यामुळे या कंपनीला त्यामुळे नोटीस पाठविण्यात आली आहे. त्यामुळे या मुद्द्यावर पुढील काळात नेमका काय निर्णय होतो, याककडे सध्या शेतकºयांचे लक्ष आहे.