बुलडाणा : भाजपमध्ये आपले आयुष्य जेमतेम सहा महिन्यांचे आहे. सहा महिन्यांपूर्वी मी पक्षात प्रवेश घे तला. त्यामुळे आपल्यावर जिल्हाध्यक्ष पदासारखी मोठी जबाबदारी येऊन पडेल, असे वाटत नव्हते, पण पक्षाने विश्वास टाकला, या विश्वासाला तडा न जाऊ देता आपल्या पाठीशी असलेला सामाजिक व राजकीय कार्याचा पूर्वानुभव पणाला लावून हे आव्हान आपण सर्मथपणे पेलणार आहोत, त्यासाठी पक्षातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे सुध्दा आपल्याला पाठबळ लागेल, तरच आपण जिल्ह्यात भाजपला चांगले दिवस आणू शकू, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष माजी आ. धृपतराव सावळे यांनी केले. भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी माजी आ. धृपतराव सावळे यांची ३0 एप्रिल रोजी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की केंद्रात नरेंद्र मोदी, तर राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपचे सरकार लोकहिताचे निर्णय घेऊन काम करीत आहे. त्यामुळे जिल्ह्यात भाजप वाढविण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे. त्या दृष्टीने आता सर्वांना सोबत घेऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार आहोत. येणार्या काळात नगर पालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका आहेत. ह्या निवडणुका शिवसेना भाजपसोबत लढणार, की वेगवेगळ्या हे पक्षश्रेष्ठी ठरवतील, पण येणार्या निवडणुकामध्ये जिल्ह्यात जर आपण बदल घडवू शकलो नाही, तर आपल्या नियुक्तीचे सार्थक होणार नाही. म्हणून त्यादृष्टीने पक्षात नेते, कार्यकर्ते व जनतेला सोबत घेऊन आपण काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पक्षाला वाढविण्यासाठी प्रयत्न करणार - सावळे
By admin | Published: May 01, 2016 1:26 AM