शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

साक्षीदारालाच बनविले प्लॉटचे मालक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 3:22 PM

चोपडे विरोधात महसूल प्रशासन आणि इतर दोन तक्रारींवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: खामगाव महसूल मंडळातील भाग-१ चा तलाठी राजेश चोपडे याने प्लॉट-विक्रीसाठी मुळ मालक बदलविताना एका प्लॉटमध्ये साक्षीदार असलेल्या व्यक्तीला दुसऱ्या प्लॉटचा मालक बनविल्याची धक्कादायक बाब समोर आले आहे. त्यामुळे निलंबित तलाठी चोपडे विरोधात आणखी तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. चोपडे विरोधात महसूल प्रशासन आणि इतर दोन तक्रारींवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.खामगाव भाग-१ चा तलाठी चोपडे याने त्याच्या कार्यकाळात मुळ हस्तलिखीत ७/१२ मध्ये बनावट नोंदी केल्या. या बनावट नोंदी करून त्या आधारे संगणकीकृत ७/१२ तयार केलेत. त्यानंतर शहराच्या विविध भागातील सुमारे शंभरपेक्षा जास्त प्लॉटची खरेदी-विक्री केली. हा घोळ करताना गट क्रमांक ११५ मध्ये एका प्लॉटच्या विक्रतीत साक्षीदार असलेल्या इसमाला चोपडेने दुसºया प्लॉटचे मालक बनविले. इतकेच नव्हेतर आपल्या मर्जीतील एक टोळी तयार करून प्लॉटची विक्री केली. यामध्ये शिवाजीराव देशमुख यांना वारसा हक्काने मिळालेला प्लॉट देखील चोपडेने बनावट दस्तवेज बनवून विकला. त्यामुळे शिवाजीराव देशमुख यांच्यावतीने त्यांचे पुत्र देवेंद्र देशमुख यांनी तलाठी राजेश चोपडे यांच्यासह ५ जणांविरोधात शुक्रवारी शहर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. यामध्ये शिवाजीराव देशमुख यांच्या मालकीचा असलेला प्लॉट शैलेश श्रीकृष्ण चोपडे यास गैरकायदेशीर खरेदीखत अस्तित्वात आणून विकल्यामुळे आरोपी विरोधात कारवाईची मागणीही देशमुख यांनी तक्रारीत केली आहे.मुख्याध्यापकाला १५ लाखा गंडा!बनावट प्लॉटच्या विक्रीतून चोपडेने एका मुख्याध्यापकाला सुमारे १५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे एक प्रकरण समोर आले आहे. गजानन नगर, यशोधरा नगर भागातील एका प्लॉटच्या विक्रीतून चोपडेने या मुख्याध्यापकाला १५ लाखाचा चुना लावल्याची माहिती समोर आली आहे.

गोपाळकृष्ण सोयायटीतील अनेक प्लॉट विकले!शेगाव रोडवरील गोपाळकृष्ण गृहनिर्माण संस्थेतील ८ ते १० प्लॉट चोपडे आणि त्याच्या साथीदारांनी मालक बदलवून विकल्याची धक्कादायक बाब शुक्रवारी उघडकीस आली. या सोसायटीतील आणखी प्लॉट विकल्या गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.निलंबित तलाठी चोपडे यांने अनेकांची फसवणूक केली आहे. शहरातील प्लॉट खरेदी विक्रीचा मोठा घोटाळा असल्याने चोपडेची मालमत्ता जप्त करावी. तसेच त्याच्या साथीदारांनाही अटक करावी. अतिशय गुंतागुंतीचा हा विषय असल्याने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमार्फत याप्रकरणी तपास करण्यात यावा.- देवेंद्र देशमुखतक्रारकर्ते, खामगाव.

 

टॅग्स :khamgaonखामगावfraudधोकेबाजी