चांडोळ : शिवारात गत दाेन दिवसांपासून लांडग्यांचा हैदाेस सुरू आहे. आणखी एका शेतकऱ्याच्या गाेठ्यातील शेळ्यांवर लांडग्याने हल्ला केल्याची घटना २२ ऑगस्ट राेजी समाेर आली आहे़ यामध्ये पाच शेळ्या ठार झाल्या तर चार गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे शेतकऱ्याचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. येथील शेतकरी मदनसिग कुंठबरे यांच्या शेतातील गाेठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर लांडग्याने हल्ला केला. यामध्ये ५ बकऱ्या ठार झाल्या असून चार गंभीर झाली आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी घटनेचा प्रत्यक्ष पंचनामा केला. यावेळी वनपाल एस.ए. अंबेकर, वनरक्षक एस.डी वानखेडे, वनरक्षक ए.बी. हिवाळे एस. डी. भिगांरे, के.जे उगले, एन.एच खानसह हजर होते.
दाेन दिवसात दुसरी घटना
चांडाेळ परिसरात लांडग्यांचा हैदाेस सुरू आहे. २१ ऑगस्ट राेजी विठ्ठलसिंग कुठंबरे यांच्या शेतातील शेळ्यावर लांडग्यांनी हल्ला करून आठ शेळ्या ठार केल्या हाेत्या. या घटनेच्या एक दिवसानंतर पुन्हा लांडग्यांच्या कळपाने गाेठ्याला लक्ष्य करीत पाच शेळ्या ठार केल्या आहेत. शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेत असल्याने वनविभागाने लांडग्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी हाेत आहे.