शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: विधानसभेत महिलांचा आवाज बुलंद केव्हा होणार?; महामुंबईत फक्त ८ महिला आमदार
5
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अल्पसंख्याक बहुल मतदारसंघात काय घडले?; १३ पैकी ६ आमदार निवडून आले
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?
10
तुमच्या वाहनासाठी आवडीचा क्रमांक घरबसल्या मिळवा; आरटीओची आजपासून ऑनलाइन सुविधा
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
15
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
16
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
17
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
18
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
19
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
20
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

जमीन मिळवून देण्याच्या नावाखाली महिलेची फसवणूक

By admin | Published: May 15, 2017 12:27 AM

बुलडाणा : शासकीय जमीन मिळवून देण्याच्या नावाखाली एका महिला पोलीस कर्मचाऱ्यासह तिच्या पतीने देऊळघाट येथील एका महिलेची तीन लाखांनी फसवणूक केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शासकीय जमीन मिळवून देण्याच्या नावाखाली एका महिला पोलीस कर्मचाऱ्यासह तिच्या पतीने देऊळघाट येथील एका महिलेची तीन लाखांनी फसवणूक केली आहे. या प्रकरणी सदर महिलेने १० मे रोजी शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे; परंतु चार दिवसांचा कालावधी उलटून गेला असतानादेखील पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नाही. त्यामुळे या फसवणूक प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी जोत्सना मो. जावेद यांनी केली आहे.पोलीस विभागात कार्यरत असलेल्या निर्मला सुखदेव जाधव यांनी माझे पती सुखदेव जाधव यांचे मंत्रालयात व इतर अधिकाऱ्यांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे तुम्हाला बुलडाणा शहरातील गट नंबर ६३ मधील पाच एकर ई - क्लास जमीन मिळवून देतो, असे सांगून तुम्हाला माझा पतीस तीन लाख रुपये द्यावे लागतील. जमीन मिळवून दिली नाही, तर तुमचे पैसे परत करू व बाँड पेपरवर लिहून देऊ, असे सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून देऊळघाट येथील ज्योत्स्ना मो. जावेद यांनी तीन लाख रुपये देऊन बाँड पेपरवर करार करून घेतला; परंतु तीन वर्षांचा कालावधी उलटून गेला असतानादेखील त्यांना जमीनच काय; परंतु पैसेसुद्धा देण्यात आले नाहीत. पैसे परत मागितले असता पती-पत्नीने लोटपाट करून तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून आत टाकू, अशी धमकी दिली. अखेर शेवटी ज्योत्स्ना मो. जावेद यांनी १० मे रोजी शहर पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त पती-पत्नी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे; परंतु गुन्हा दाखल होऊन चार दिवसांचा कालावधी उलटून गेला असतानादेखील पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नाही. निर्मला जाधव या पोलीस विभागात असल्यामुळे त्यांना पाठीशी घालण्यात येत असल्याचा आरोपही सदर महिलेने केला आहे. त्यामुळे या फसवणूक प्रकरणातील आरोपींना अटक करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ज्योत्स्ना मो. जावेद यांनी केली आहे.