मोताळा : थ्रेशर मशीनमध्ये अडकल्याने भारती सुनील खराटे (३९, रा.तळणी) या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास तळणी शिवारात घडली. तालुक्यातील तळणी येथील शेतकरी सुनील ओंकार खराटे यांच्या तळणी शिवारातील गट नंबर ३७१ मधील त्याकरिता गावातीलच ट्रक्टर (एम.एच. ३४- ५५०९) व थ्रेशर मशीन लावलेली होती. दरम्यान, शेतकरी सुनील खराटे यांची पत्नी भारती खराटे या थ्रेशरच्या मागे तूर जमा करीत असताना, त्यांचे केस अडकल्याने त्या थ्रेशर मशीनमध्ये ओढल्या गेल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर वार्ता कळताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी उसळली. माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केला. खराटे दाम्पत्याला एक मुलगा व एक मुलगी आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी मिलिंद बोदडे यांच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी कलम १७४ जा.फौ.नुसार मर्ग दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनात पोहेकाँ प्रल्हाद वानखेडे, पोकाँ ज्ञानेश्वर धामोडे करीत आहेत.
थ्रेशरमध्ये अडकल्याने महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 5:59 PM
Buldhana Accident News महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास तळणी शिवारात घडली.
ठळक मुद्देशेतात रविवारी तूर काढणीचे काम सुरू होते.केस अडकल्याने त्या थ्रेशर मशीनमध्ये ओढल्या गेल्या.