लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात शनिवारी तपासण्यात आलेल्या २९३ संदिग्धांच्या अहवालांपैकी ४७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, २४६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, चिखली तालुक्यातील बेराळा येथील एका ६५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये चिखली पाच, बुलडाणा एक, कोलवड एक, देऊळगाव राजा दहा, घोडेगाव एक, सातेगाव एक, देऊळगाव मही एक, सिंदखेड राजा एक, जळ पिंपळगाव एक, सावखेड तेजन चार, दुसरबीड एक, धारकल्याण एक, खामगाव १६, मलकापूर एक, दाताळा एक, आणि अकोला जिल्ह्यातील दहिगाव येतील एकाचा समावेश आहे. दुसरीकडे चिखली तालुक्यातील बेराळा येथील ६५ वर्षीय महिलेचा कोलोनामुळे मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतकांची संख्या १४३ झाली आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ११ हजार ७८२ झाली असून, त्यापैकी ११ हजार ३३६ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. शनिवारी ३७ जणांनी कोरोनावर मात केली. यामध्ये खामगाव कोविड केअर सेंटरमधील चार, बुलडाणा आठ, सिंदखेड राजा सात, देऊळगाव राजा एक, नांदुरा दोन, चिखली पाच आणि शेगावमधील चार जणांचा समावेश आहे.
८०,९८५ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ८० हजार ९८५ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे, तर ११ हजार ३३६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या १, ५५० संदिग्धांच्या अहवालाची प्रतीक्षा असून, ३०३ सक्रिय रुग्णांवर सध्या उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १४३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.