लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: शेतात काम करत असताना वीज पडून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना १७ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास तालुक्यातील पेनसावंगी येथे घडली.चिखली तालुक्यातील पेनसावंगी येथील शेतकरी माधव डिगांबर शेजूळ यांच्या शेतात कोथिंबीर काढण्याचे काम सुरू होते. या कामासाठी गावातील सात ते आठ महिला मजूर कामाला सांगण्यात आल्या होत्या. दरम्यान, दुपारी दोन वाजेच्या सुमारास आकाशात अचानक काळे ढग जमा होऊन विजेच्या गडगडाटासह पाऊस कोसळायला सुरुवात झाली. या दरम्यान अचानकपणे शेतात वीज कोसळली व यामध्ये मंगला विठ्ठल एरमुले (वय ३५ वष्रे) यांचा जागीच मृत्यू झाला तर शशिकला सुखदेव इरले (वय ६0) वर्ष ही महिला गंभीर जखमी झाली आहे. या घटनेतील जखमी महिलेला प्रदीप पाटील यांच्या गाडीमधून ताबडतोब चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, ितच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेचा पंचनामा महसूल विभागाकडून करण्या त आला असून, या घटनेमुळे पेनसावंगी गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेली महिला मंगला एरमुले यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. मागील दोन दिवसांपासून अनेक भागात विजा कोसळत असल्यामुळे विजेच्या अनेक उपकरणांचे नुकसान होत आहे.
चांडोळ येथे जनावरे ठारबुलडाणा तालुक्यातील चांडोळ येथे वीज कोसळल्यामुळे विजय दौलत सोनुने यांच्या मालकीच्या गोठय़ात असलेले एक गाय, एक गोर्हा जागीच ठार झाला. याबाबत माहिती मिळताच तलाठय़ाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या घटनेमुळे विजय दौलत सोनुने या शेतकर्याचे जवळपास ६५ हजारांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.