लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : अकोला येथून विवाह सोहळा आटोपून मलकापूरकडे परतणार्या नवरदेवाच्या गाडीला शुक्रवारी रात्री अपघात झाला. त्यात नवरदेव-नवरी गंभीर जखमी झाले. तर दुसर्या घटनेत शनिवारी पहाटे तालु्क्यातील बहापुरा येथे रेल्वे रुळ ओलांडताना एक युवती ठार तर तिची चुलत बहीण जखमी झाली. मलकापुरातील शिवाजी नगर भागातील रहिवाशी तथा पालिका कर्मचारी सदाशिव तायडे यांचा मुलगा दीपक याचा विवाह अकोला येथील जठार पेठमध्ये राहणारे बळवंतराव आपोतीकर यांची कन्या रेणू हिच्याशी २३ नोव्हेंबरला पार पडला. विवाहाचे सोपस्कार आटोपून नवरदेव नवरी स्वीफ्ट डिझायर या गाडीने मलकापूरकडे निघाले. पहाटे १.२0 वाजेच्या सुमारास अकोल्यावरून मलका पूरकडे येत असताना विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव वेगातील टाटा इंडिका (क्र.एम.एच.३0 एल.७७१४ ) स्वीफ्ट डिझायर गाडीवर चालकाच्या बाजूने जोरदार आदळली.यामध्ये दीपकच्या नाकावर आणि रेणूच्या शरीराला जबर मार लागला. त्यामुळे दोघेही गंभीररीत्या जखमी झाले आहेत.यावेळीे नाशिक पोलिसांची गाडी जात होती. त्यातील कर्मचार्यांनी वाहनातील नवरेदव-नवरीला अकोला येथील सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार केल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. दीपक आणि रेणू हे दोघेही जखमी झाल्याने २४ नोव्हेंबरचा स्वागत समारंभही रद्द करण्यात आला.
रेल्वेच्या धडकेत एक युवती ठार, दुसरी जखमी